पांढरी गावात लसीकरणाला सुरुवात
महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आष्टी (प्रतिनिधी) माझे गाव,लसीकरण युक्त गाव,असा निर्धार करत आष्टी तालुक्यातील पांढरी गावाचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असून बुधवारी पहिल्याच दिवशी 270 नागरिकांचे लसीकरण झाले असून उर्वरित नागरिकांचेही लसीकरण पूर्ण करण्याच्या दिशेने गावक-यांनीच पुढाकार घेतल्याची माहिती सरपंच सुधीर पठाडे यांनी दिली आहे.
हा अनोखा उपक्रम गावक-यांच्या सहकार्याने आणि एकदिलाने होत असल्याने कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे कसे का आवश्यक आहे याबद्दल जनजागृती करत नागरिकांची प्रथमतः मानसिकता तयार केली गेली.त्यानंतर दोन दिवसात हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्याचे काम गाव पातळीवर सुरु असल्याचे सांगत आत्तापर्यंत 270 नागरिकांनी विशेषतः महिलांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती सरपंच सुधीर पठाडे यांनी दिली.
यावेळी जालिंदर वांढरे,संतोष शेळके,नितिन पोठरे,संजय शेळके,प्रकाश हंबर्डे,बंडू देशमुख,प्रकाश वांढरे,अशोक शेळके,सतीश सोळुंके,विकास वांढरे,राजू वांढरे आदींनी हि मोहिम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही पठाडे यांनी सांगितले.
stay connected