माणिकनगर येथे राष्ट्रीयसंत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्ताने ह.भ.प.सोपान महाराज सानप (शास्त्री) यांच्या किर्तनाचे आयोजन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्री महारूद्र संस्थान माणिकनगर येथे श्री संत भगवानबाबा यांचा सार्वजनिक जयंती सोहळा साजरा होणार असून यानिमित्त धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या भव्य किर्तनाचा भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ऐश्वर्या संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव माणिक नगर परळी वैजनाथ यांच्या वतीने श्री महारूद्र संस्थान माणिकनगर येथे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा होणार आहे. यामध्ये भागवताचार्य ह.भ.प. सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोली कर यांचे कीर्तन दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे तसेच मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. उत्तम महाराज होळंबे (मैंदवाडीकर), ह.भ.प. भरत महाराज सोडगीर हे मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत तसेच सकाळी 10 ते 12 वाजता श्री संत भगवान बाबा यांची जयंती व मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीचा गुलालाचा कार्यक्रम व तद्नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी शहरातील व पंचक्रोशीतील व भाविक भक्त, नागरिक बंधू भगिनी यांनी जयंती उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे श्री संत भगवानबाबा जयंती उत्सव समिती माणिकनगर, शास्त्रीनगर, नाथ नगर यांनी केले आहे.
stay connected