पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि महसूल कर्मचारी संघटना यांच्यातील वाद, कामबंद आंदोलनाने संघर्ष विकोपाला?

 पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि महसूल कर्मचारी संघटना यांच्यातील वाद,  कामबंद आंदोलनाने संघर्ष विकोपाला?       


 अहमदनगर प्रतिनिधी( सुनिल नजन)         


                    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे आणि महसूल कर्मचारी संघटना यांच्यातील वाद विकोपाला गेला असुन तहसीलदार देवरे यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयाचे कर्मचारी आणि पारनेर तालुक्यातील तलाठ्यांनी कामबंद आंदोलन दि.२५आँगष्ट पासून सुरू केले आहे.सर्व कर्मचारी बुधवार पासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. एक तर आमच्या पारनेर तालुक्याच्या बाहेर बदल्या करा नाही तर तहसीलदार यांची बदली करा तो पर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही असा पवित्रा सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तहसीलदार ज्योती देवरे नेमका काय त्रास देतात हे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पारनेर तालुका तहसील कर्मचारी संघटना आणि पारनेर तालुका तलाठी संघटना बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.तहसीलदार देवरे यांनी या बाबद सांगितले की काही कर्मचारी, तलाठी हे कुठलीही लेखी सुचना न देता कामावर हजर नसले तरी नायब तहसिलदार,अव्वल कारकून हे कामावर हजर आहेत.ते सर्व सामान्य नागरिकांच्या कामाची योग्य प्रकारे दखल घेत आहेत.तुमचे आंदोलन बंद करा नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगुन तुमच्या बदल्या दुरवर अतीदुर्गम भागात करू अशी धमकी शिवसेनेचे जेष्ठ नेते काशिनाथ दाते यांनी दिली असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे. धमकी दिली त्या वेळी त्यांच्या समवेत रामदास भोसले हेही होते असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दाते यांनी अगोदरच तहसीलदार यांची भेट घेतली होती आणि मग नंतर ते आंदोलन स्थळी येवून वरील वक्तव्य केल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे महसूल कर्मचारी संतप्त झाले असून महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक रोकडे आणि तलाठी संघटनेचे अध्यक्ष यु.एस्.मांडगे यांनी कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नाही असे सांगितले. तहसीलदार आणि कर्मचारी वर्ग यांच्या तील वाद मिटला नाही तर आपण स्वतः तहसीलदारासह सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार आहोत असे दाते म्हणाले. तहसीलदार यांनी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेउन सहानुभूती मिळवन्याचा प्रयत्न केला.हजारे यांनी सांगितले की तुकाराम मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा.पण आपला कारभार स्वच्छ असला पाहिजे.नोकरी करायची म्हणजे बदली ही अटळ असते.एकंदरीत तहसीलदार  देवरे यांनी क्लीप व्हायरल करून आपल्या असंख्य अडचणीत वाढच केल्याचे दिसून येते. देवरे यांच्या बाबतीत करायला गेला गणपती आणि झाला मारुती ही म्हण योग्य प्रकारे लागू पडते. आपली या भ्रष्टाचार चौकशी प्रकरणातुन सहीसलामत सुटका व्हावी म्हणून देव पाण्यात बुडून ठेवण्याची वेळ तहसीलदार यांच्या वर आली आहे.पण आमळनेर आणि मालेगाव येथे सेवेत असताना ईतरांना त्रास देताना आपण काय काय खेळ्या केल्या याचा तहसीलदार यांना विसर पडलेला दिसतो.जैसी करणी वैसी भरणी या म्हणीप्रमाणे सारा कारभार सुरू झाला आहे.तहसीलदार हटाव मोहीमेला संपूर्ण पारनेर तालुक्यातील जनतेचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.