वाढदिवसानिमित्त हारतुरे, सत्कार स्वीकारणार नाही फक्त भ्रमणध्वनीवरून स्वीकारणार शुभेच्छा
------------------
आ.बाळासाहेब आजबे यांचे आवाहान
आष्टी (प्रतिनिधी)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघातील काही गावातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. अशात कार्यकर्त्यांनी गर्दी जमवून सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेतआपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाहीयाची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी हारतुरे, फेटे, गुच्छ घेऊन येऊ नये त्याऐवजी सर्वांनी गावातच राहून कोरोना रोगाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून गोरगरिबांना मदत करावी असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आष्टी मतदार संघातील कार्यकर्ते वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतात यावर्षी हि आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून अनेक कार्यकर्त्यांचे विविध कार्यक्रम आयोजनाबाबत आपणाकडे आग्रह धरला होता परंतु कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता आपण लोकांना गोळा करून त्यात कोरोना वाढ होईल असे कार्यक्रम घेणे योग्य नाही त्यामुळे यावर्षी कार्यकर्त्यांनी संयम ठेवत आपल्या गावातच राहून वृक्षरोपण सारखे उपक्रम राबवत व आपल्या गावातील जनतेची काळजी घेत आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित आपले गाव सुरक्षित हे लक्षात घेऊन साधेपणाने वाढदिवस साजरा करावा वाढदिवसानिमित्त कोणीही मला भेटण्यासाठी येऊ नये मी कोणालाही भेटणार नाही फक्त भ्रमणध्वनीवरून सर्वांच्या शुभेच्छा मी स्वीकारणार आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचे राज्यात दिड वर्षापासून मोठे संकट निर्माण झाले आहे. यातच मतदारसंघात रूग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचे भान ठेवून यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवसा दिवशी कोरोना रूग्णांना, लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या गोरगरीब कुटुंबियांना व अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करावी. यावर्षी कार्यकर्त्यांनी आपले सामाजिक भान ठेवून माझा वाढदिवस साजरा केलेला सार्थक होईल असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
stay connected