*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा निवड चाचणी आयोजित करण्यात येणार : सुरेश मोरे*
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने सप्टेंबर मध्ये राज्यस्तरीय मुले / मुली अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या वतीने सप्टेंबर मध्ये जिल्हास्तरीय सिनियर गटाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय निवड चाचणीद्वारे राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात येणार असून निवडण्यात आलेला संघ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत-जास्त क्रिकेट खेळाडूंनी आपल्या नावाची निवडपूर्व नोंदणी 3 सप्टेंबर पर्यंत 9763793717,9420005106 या क्रमांकावर करावी. नोंदणी केलेल्या खेळाडूंचीच कोरोना नियमांचे पालन करून निवड चाचणी घेण्यात येणार असल्याचे बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष कांतीलालजी चानोदिया, शकिल शेख व पदाधिका-यांचे वतीने सांगण्यात आले आहे.
stay connected