अन्वी च्या उपचारासाठी लागणाऱ्या १६ करोड रुपये जमा करण्यासाठी चिमुरडयांनी दिली राक्षबंधांची अनोखी भेट
विजय तळेकर पुणे
२२ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन मोठ्या उत्सहात साजरे करण्यात आले. रहाटणी, पुणे येथील अन्वी सुरज वाव्हळ या चिमुकल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील धानोरा तालुका आष्टी येथील काही चिमुरड्यांनी आपल्या खाऊचे पैसे अन्वीला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दिले तसेच गावातून मदत फेरी सुद्धा काढली आणि तब्बल १५ ते २० हजार रुपये जमा करून अन्वीला मदत म्हणून दिले आहेत. या बालगोपाळांनी समाजासमोर माणुसकीचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे आणि बीड जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे कि कृपया तुम्हाला जमेल तेव्हडी मदत करा आणि अन्वीचा जीव वाचवून तिला सामान्य जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा. जनतेतून सामान्य व्यक्तीने छोटीशी मदत म्हणून ५००-१००० रुपये जरी दिले तरी खूप मोठी मदत होऊ शकते आणि अन्वीला जीवनदान देऊ शकते तसेच जिल्ह्यातील सामाजिक भान असणाऱ्या मोठ्या दानशूर व्यक्तींनाही आम्ही आवाहन करू इच्छितो कि आपणही या कार्यात खारीचा वाटा उचलावा आणि अन्वीचा जीव वाचवावा. यासाठी युवा एकता सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र, सावंत माळी संघटना बीड, आष्टी तालुका पत्रकार संघ, दुकानदार संघटना, धानोरा येथील ग्रामस्थ, गणपती मंडळे, बीड जिल्यातून अन्वीला मदत गोळा करण्यासाठी पुढे आले आहेत.
साधारण २ महिन्यापूर्वी रहाटणी, पुणे येथील अन्वी सुरज वाव्हळ ही सतरा महिन्याच्या मुलीला S.M.A (Spinal muscular atrophy) या अत्यंत दुर्मिळ जनुकीय आजाराचे निदान झाले आहे. यातून तिला बरे होण्यासाठी १६ कोटींच्या जनुक थेरपीची लस आवश्यक आहे. अन्वीचे आई-बाबा, नातेवाईक, मित्रपरीवार हा निधी उभा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. सध्या अन्वीवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे डॉ संदीप पाटील यांच्या सल्ल्याने घरीच उपचार सुरु आहेत. तथापि, डॉक्टरांनी अमेरिकेच्या नोव्हार्टीस कंपनीनीचे १६ कोटींचे ड्रग अन्वीच्या उपचारासाठी सांगितले आहे आणि त्यासाठी तिचे आई-बाबा आणि सगळे युवक एकत्र आले आहेत. कुठल्याही सामान्य कुटुंबाला एवढी मोठी रक्कम जमा करणे खूप मोठे आवाहन आहे पण नक्कीच अशक्य नाही. तरी सगळ्या महाराष्ट्रातून, देशातून, आपल्या ओळखीतून जेवढी जमेल तेवढी, जशी सामील तशी मदत करण्याचे आवाहन हि यानिमित्ताने केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी यासाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. अन्वीची आई आरती सुरज वाव्हळ आणि बाबा सुरज वाव्हळ यांनी सर्व दानशूरांना आवाहन केले आहे कि त्यांच्या लेकीला वाचवण्यासाठी जमेल तेव्हडी, जमेल तशी मदत करा. आपण अन्वीला मदत करण्यासाठी खालील दिलेल्या नंबर आणि अकॉउंट वर मदत करू शकता.
Suraj Wavhal (Anvi's Father)
Gpay/PhonePay/Paytm 9766188989
Bank Account Details
Name : Anvi Suraj Wavhal
Account #: 50100440238877
IFSC Code : HDFC0001795
Branch : HDFC Chinchwad
बीड जिल्ह्यातून जर कोणाला अन्वीच्या मदतीसाठी टीम मध्ये सामील व्हायचे असेल तर आपण तेज वार्ता न्युज -८८८८३४७०३३, युवा एकता सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्- ९४०५३५२०३१ आणि सावंत माळी संघटना बीड - ८०८०५६५५९९ यांना संपर्क करू शकता.
stay connected