चिंचाळा येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वनवन भटकंती



चिंचाळा येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वनवन भटकंती 

टॅकर चालु करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे तात्काळ टॅकर चालु करण्याची मागणी

आष्टी प्रतिनिधी

एका बाजूला कोरोना संक्रमणाच संकट उभे आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणी टंचाईच संकट  उभं ठाकलंय. आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून पाण्यावाचून दिवस कसे काढायचे असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात कुठेही पाणी मिळत नसल्याने चिंचाळा येथे  हंडाभर पाण्यासाठी महिलांची वनवन भटकंती सुरू आहे तरी टॅकर चालु करण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे तात्काळ टॅकर चालु करण्याची मागणी चिंचाळा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते चेअरमन सुनील पोकळे यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे  मार्च महिन्यापासून गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्यासाठी व दैनंदिन गरजेसाठी पाणी उपलब्ध राहिले नाही या भागात पुरेसा पाऊस झाला नव्हता तसेच विहीरी  व बोअर कोरडे ठाक पडल्याने चिंचाळा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ येथील महिलावर आली आहे. यामुळे टँकरने तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी चिंचाळा येथील  ग्रामस्थ  व सामाजिक कार्यकर्ते चेअरमन सुनील पोकळे यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.