अफवा पसरवु नका, नागरिकांनी घाबरू नये. - अनिल तात्या ढोबळे

कोणीही अफवा पसरवु नये, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. -अनिल तात्या ढोबळे
कडा ( आयुब मोमिन ) -
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे मुंबईहुन आलेल्या पाहुण्यांचे कोरोना पॉजीटीव रिपोर्ट आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील काही लोकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले होते. सुदैवाने कोरोनाचे आष्टी तालुक्यातील सर्व अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. तरी कडा शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता संयम पाळावा . अफवेवर कोणीही विश्वास ठेऊ नये. व कोणीही खोटी अफवा पसरू नये. असे आवाहन कडा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे. खोटी अफवा कोणी पसरविली असता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येइल. असे कडा शहराचे सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे यांनी तेजवार्ता शी बातचीत करताना सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.