रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट

*रिक्षा चालकांवर उपासमारीचेसंकट*
..............................
 _शासन मदतीसाठी आ. महाजनांकडे साकडे_
..............................
जळगाव दि. 20 मे( एजाज़ शाह)- देशभर कोरोना संसर्गाने थैमान घातल्याने जन जीवन विस्कळीत झाले त्याचा जबर फटका रिक्षा चालकांना मोठ्याप्रमाणावर बसला असल्याने त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची भीषण संकट कोसळले आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक - चालक संघटनेने किराणा कीटसह आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे आ. गिरीशभाऊ महाजन यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे सदरील निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनस्तरावर पोहचवून मदतीचे आश्वासन आमदारांकडून देण्यात आले.
कोरोना संसर्ग आजाराचा कहर वाढत चालला असून गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाउनचे तंतोतंत पालन करून रिक्षा युनियनने घरातच बसणे पसंत केल्यामुळे कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने रिक्षा चालकांना दहा हजार रुपये व किराणा कीट तातडीने द्यावे अशी मागणी जळगाव जिल्हा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनने केली आहे
सदरील निवेदन आ. गिरीशभाऊ महाजन यांचेकडे देण्यात आले. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. चंदू पटेल, आ. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे, आ. स्मिताताई वाघ, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रल्हादभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद वाणी, अस्लम शेख, नईम खाटीक, प्रभाकर तायडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.