*कोरनटाइन केंद्र शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयातील वस्तिगृह बाबत आयुक्ताना निवेदन*

*कोरनटाइन केंद्र  शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयातील वस्तिगृह बाबत आयुक्ताना निवेदन*
जलगांव: (एजाज़ शाह) दि.20 मे
जळगाव जिल्हा मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांनी  बुधवारी मा आयुक्त जळगाव यांना ईमेल मार्फत एक निवेदन सादर केले असून त्यात ज्या लोकांना कोरन्टीन करण्यात येत आहे व त्यांना वस्तीगृहत ठेवण्यात येत आहे त्या ठिकाणी खालील सुविधा त्वरित करण्यात याव्यात
१) प्रवेश वेळी नोंदणी करतांना त्यांची महिती लिहतांना ते सम्पूर्ण कुटुम्ब आरोपी सारखे अर्धा पौन तास उभे असतात त्यात वृद्ध पुरुष,महिला,लहान मुलाच्या माता चा समावेश असतो तरी त्यांना बसन्यासाठी खुर्च्या ठेवण्यात याव्यात
२) होस्टल मधील बेडशीट व टॉवेल  दूसरे पेशंट आलयवर त्वरित बदल करून द्यावे
३) लहान बाळास दूध देण्यात यावे(आज बुधवारी सांगण्यात आले की चहवाला दूध आणने विसरला)
४) स्वछता अजिबात नसते तरी दोन वेळा रूम व स्वछता गृह सफाई करण्यात यवित
५) होस्टल मधे पिण्य च्या पाणी साठि कूलर आहे वास्तविक या लोकांना गरम पाणी देण्यात यावे
६) प्रश्सनाला या सुविधा साठि अड़चन असेल तर घरून चहा, नाश्ता, फळ, दूध ,देण्याची परवानगी देण्यात यावी
अशा आशयाचे निवेदन दिले असून त्यांची प्रत मा जिल्हाधिकारी यांना सुद्धा देण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.