वॉईन शॉप व देशी दारू दररोज सुरू
कोरोनामुक्त जामखेडची बाजारपेठ आ.रोहित दादांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
( प्रतिनिधी - नासिर पठाण / अशोक विर)
जामखेड - शहर कोरोनामुक्त झाले असल्याने छोटे मोठे व्यवसाय सुरू करून पुन्हा काही प्रमाणात अर्थचक्र सुरळीत चालू करण्यासाठी आ.रोहित दादा पवार यांनी पुढाकार घेऊन आ व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन अटी शर्तींसह बुधवार पासून दुकाने सुरू करण्याचे सर्वानुमते ठरले तर उत्पादन शुल्क अधिकारी यांनी वॉईन शॉप व देशी दारू दुकान दररोज १० ते ५ यावेळेत सुरू ठेवून इतर परमीट व बार लॉकडाऊन उठेपर्यंत बंद ठेवली आहे.
राज लॉन्स येथे आ. रोहीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रांत अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांचेसह कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, विठ्ठलराव राऊत, शरद शिंगवी, निलेश तवटे, किशोर कांक्रिया , नंदकुमार तोडकरी ,उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, काकासाहेब कोल्हे, नगरसेवक अमित जाधव, विजयसिंह गोलेकर, आहिरे सर आदी. उपस्थित होते.
राज लॉन्स येथे व्यावसायिक व पदाधिकारी यांच्या अयोजीत बैठकीत सर्वप्रथम आ. रोहीत पवार यांनी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी सर्व प्रशासन अधिकारी व जनता यांनी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करून आपला जामखेड पॅटर्न राबवला याबाबत सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी पिण्याचे पाणी, भाजीपाला आणि वीजपुरवठा तसेच पुणे मुंबईहून आलेल्या नागरिकांबाबत अधिक काळजी घेण्याबाबत सुचना केल्या.
आ. रोहीत पवार यांनी सर्व दुकाने एकाचवेळी उघडले जाणार नाही अत्यावश्यक सेवा असलेले दुकाने दररोज ठरलेल्या वेळेत उघडी राहतील सरकारच्या मार्गदर्शन नुसार परमिट रूम, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, क्रिडांगण, जिम, आईस्क्रीम पार्लर हे दुकाने लॉकडाऊन उठेपर्यंत बंद राहतील तर इतर दुकानांना आठवड्यातून दोन दिवस परवानगी दिली जाणार आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टिंक्शन पाळणे आवश्यक आहे, दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन आ. रोहीत पवार यांनी केले.
stay connected