बीड ( प्रतिनिधी ) -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याच अनुषंगाने गेल्या तीन महिन्यांपासून परिवहन महामंडळाची लालपरी म्हणजेच बस सेवा बंद करण्यात आली होती. आता हीच बस सेवा उद्यापासून जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत वृत्तांत असा की, महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार मुद्दा क्रमांक 14 (ड) नुसार नाॅन रेड झोनमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक जिल्हा अंतर्गत बसच्या प्रवाशी आसन क्षमते नुसार 50 प्रवाशांना घेऊन बस सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बीड विभागांतर्गत दिनांक बावीस पासून म्हणजेच उद्यापासून बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. असे पत्र विभाग नियंत्रक विभाग यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना दिले आहे.
stay connected