*💥कोरोना अपडेट💥*
*अहमदनगर शहरातील ६७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू*
अहमदनगर (शेख फज़ल )
नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी मान्यताप्राप्त लॅब कडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, या महिलेच्या निकट सहवासितांचे स्वाब घेण्यात येत असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

stay connected