गावाचे आरोग्य व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करून क्वाॅरन्टाईन करा - सुरेश पाटोळे

गावाचे आरोग्य व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करून  क्वाॅरन्टाईन करा - सुरेश पाटोळे

▪️कर्तव्यावर असलेले पोलीस  व आरोग्य विभाग यांचा " भारताचे संविधान "  देऊन केला सन्मान.▪️

पिंपळवंडी (प्रतिनिधी)
      बाहेरील राज्यातील व परजिल्ह्यातील बीड जिल्ह्यात परतणाऱ्या मजुर, विद्यार्थी, प्रवाशी व इतर व्यक्तींची सखोल चौकशी करून क्वाॅरन्टाईन करा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मानवी हक्क अभियान चे जिल्हा सरचिटणीस सुरेश पाटोळे यांनी ग्रामसुरक्षा समितीसह आरोग्य व पोलीस संरक्षण विभाग यांना केली आहे.
     तसेच कर्तव्यावर असलेले अंमळनेर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे यांना "भारताचे संविधान" देवून त्यांचा सन्मान करून कामाचे कौतुक केले. यावेळी गावातील ग्रामसुरक्षा समितीसह पत्रकार दयानंद सोनवने, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, जालिंदर पवार,आदि उपस्थित होते.
    सध्या बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागातील गावाचे आरोग्य व सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी नुकतीच आमळनेर सर्कलमधील अनेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामसुरक्षासह पत्रकार यांच्याबरोबर चर्चा करून महामारी कोरोना रोगाबद्दल सर्वांशी चर्चा केली.
        क्वाॅरन्टाईन केलेल्या व्यक्तींकडुन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत खात्री करण्याची जबाबदारी ही सरपंच, ग्रामसेवक, तलाठीसह ग्रामसुरक्षा समितीकडे आहे. परंतु काही गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा पथक सदस्य हे काही लोकांकडुन नियमाचे उल्लंघन झाल्यास दुर्लक्ष करीत आहेत. गावाचे आरोग्य व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्हयात परतणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसुरक्षा समिती कडे देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ग्रामसुरक्षा समितील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी व पोलीस यांनी आपले कर्तव्ये चोख बजवावे त्यांनी कर्तव्यात कसुर करू नये. म्हणून कायद्याचे काटेकोर पालन करावे.
        बाहेरील जिल्हयातुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ही सरपंच, ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा पथकांची आहे. आपण आपले कर्तव्य चोख बजावुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य केल्यासच कोरोनाला गावापासुन दुर ठेवु शकतो.
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड१९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.