कोरोना मुळे कर्जत तालुक्यात 67 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना मुळे कर्जत तालुक्यात 67 वर्षीय महिलेचा  मृत्यू

कर्जत (असलम पठाण ) -राशीन : पुणे, मुंबईहून आलेल्या लोकांमुळे गावकरी धास्तावले आहेत. कारण दररोज एकेना एक घटना घडत असल्याने गावकऱ्याच्या मनात ही भीती बसली आहे. मुंबई (वाशी) येथून राशीनला मुलीकडे आलेल्या कोरोना संशयित महिलेचा मृत्यू आहे. गावपातळीवरील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या साठवर्षीय महिलेचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नगर येथे पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र, रस्त्यातच मृत्यूने गाठले. या बाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला 13 मे रोजी मुंबई (वाशी) येथून राशीनला आपल्या मुलीकडे आली होती. त्यांना दम्याचा, घशाचा त्रास होत असल्याने 16 मे रोजी संबंधित महिलेची नगरला वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार देऊन कोरोना संशयित रूग्ण म्हणून राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना क्वॉरंटाईन केले होते. बुधवारी (ता. 20) रात्री या महिलेस दम लागत होता, घसाही दुखत होता आणि तापही आला असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील जिल्हा रूग्णालयात 108 रूग्णवाहिकेने नेले जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या महिलेस रक्तदाब, मणक्‍याचा विकारही असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी सांगितले. विलगीकरण कक्षातील या महिलेच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी राशीनसह परिसरात पसरली. सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मृत्यू जर कोरोनामुळे झाला असेल तर ती महिला त्यांच्या नातेवाईकांसह, विलगीकरण कक्षातील आणि परिसरातील कोणा-कोणाच्या संपर्कात आली असेल याची माहिती प्रशासनाला घ्यावी लागेल, तातडीने उपाययोजना राबवाव्या लागतील. वैद्यकीय तपासणी नंतर महिलेचा कोरोना अहवाल पोसिटिव्ह आला आहे. कर्जत तालुक्यातील हा पहिलाच बळी कोरोनामुळे झाला आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर प्रशासनाने खबरदारी म्हणून आता काय निर्बंध लावणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.