"हज यात्रेकरूंचे उत्साहात स्वागत" सरपंच भिमराव बोडखे यांनी घडवले भाईचाऱ्याचे अनोखे दर्शन .

 "हज यात्रेकरूंचे उत्साहात स्वागत" सरपंच भिमराव बोडखे यांनी घडवले भाईचाऱ्याचे अनोखे दर्शन .



       आदर्श गाव सराटेवडगाव/आनंदवाडी येथील मुस्लीम बांधव सौदी अरेबिया या देशातील पवित्र स्थळ "मक्का- मदिना" हज- उमरा यात्रा करून सुखरूप आपल्या गावी पोहोचले.हज झाले तर जीवनाचा सार झाला असे म्हणतात ही यात्रा आत्मशुद्धीसाठी व अल्लाहशी जवळीक साधण्यासाठी   शुद्धीकरण व आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची मानली जाते...

Vdo पहा👇📽️




हज यात्रेवरून गावी पोहोचल्यानंतर नेहमीच बंधू भावाने वागणारे आदर्श गाव सराटेवडगाव/आनंदवाडी चे सरपंच श्री.भिमराव बोडखे यांनी हज यात्रेकरूंचे मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे स्वागत केले यामध्ये सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक रशीद भाई शेख,अन्सार भाई शेख (PSI), शब्बीर भाई शेख चेअरमन (बाभुळगाव खालसा ),इंजिनिअर अझहर शेख,जालिंदर भाई शेख, इसाक भाई शेख,जावेद भाई,जैतूनबी शेख अम्माजी,अफसाना मॅडम,खातून शेख,मदिना शेख,मुस्कान शेख,हमीद शेख, तायरा शेख,यांना हज यात्रेचे दर्शन घडून आणण्यासाठी शब्बीर भाई शेख पूनावाले यांनी अथक परिश्रम घेतले या सर्वांचे स्वागत करण्यात आले. 

    याप्रसंगी उपसरपंच लहू आबा तरटे, माजी उपसरपंच विष्णू झगडे,माजी उपसरपंच महादेव शिंदे,सर्व ग्रा.पं. सदस्य, तान्हाजी सुंबरे पाटील,देविदास गायकवाड साहेब,अतिक शेख सर, बाबा भाई शेख, शरीफखान पठाण साहेब, बादशहा भाई शेख,उस्मान भाई प्रा.अझहर शेख, इमाम भाई,आसिफ भाई,आयुब भाई,जाकीर हुसेन आदि ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.