भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने विनम्र अभिवादन.....
आठवण तुझीच येऊनी जिव रडतो कधी कधी...!
जळतो हा जीव माझा भिमराया कधी कधी...!!
नांदेड/अर्धापूर :- उध्दव सरोदे
महामानव,भारतरत्न बोधिसत्त्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड रेल्वे स्टेशन परिसरातील पुर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर पुज्यनिय भन्तेजी यांनी सर्वांना त्रिशरंण पंचशील दिले. त्यानंतर पुजापाठ,भिमस्तुती, भिमस्मरण व इतर गाथांचे ग्रहण करण्यात आले.यावेळी पुज्यनिय भन्तेजी,नांदेड जिल्हा पदाधिकारी युवराज मोरे,पि.एम.वाघमारे,सा.ना. भालेराव,सुभाष नरवाडे,सुरेश लोकडे, पत्रकार उध्दवराव सरोदे,जनार्दन जमदाडे,कृष्णा गजभारे,गायकवाड व नांदेड जिल्हा शाखा,तालुका शाखा पदाधिकारी,समता सैनिक दल, यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


stay connected