*राज्यस्तरीय 'साहित्य ज्ञानयज्ञ' पुरस्कार.. कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना जाहीर*
अहिल्यानगर:- कोल्हापूर कवी सरकार स्वाभिमानी वाचनालयाच्या वतीने जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारात अहिल्यानगर येथील कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना राज्यस्तरीय साहित्य ज्ञानयज्ञ पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे निवड पत्र बाळासाहेब देशमुख यांना ,कवी सरकार विलास पाटील यांच्याकडून नुकतेच मिळाले आहे.
सदर पुरस्कार वितरण २६ वे ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर मध्ये होणार आहे. हे संमेलन, करवीर वाचन मंदिर, भवानी मंडप कोल्हापूर येथे होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक कवी गोविंद त्रिंबकराव लहाने,सोनपेठ परभणी यांची निवड झालेली आहे.
पुरस्कार वितरण संमेलनाध्यक्ष साहित्यिक गोविंद त्रिंबकराव लहाने यांच्या शुभहस्ते बाळासाहेब देशमुख यांना पुरस्कार दिला जाणार आहे. सदर साहित्य संमेलनमध्ये श्री बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम देखील सादर होणार आहे.
बाळासाहेब देशमुख यांनी साहित्य क्षेत्रात प्रासंगिका, वात्रटिका ,ललित लेखन , कथालेखन असा साहित्य क्षेत्रात विपूल लेखन केलेले आहे.
त्यांचा 'रंग माझा वेगळा' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीस लवकरच येत आहे.
पुरस्कार बद्दल साहित्यिक सदानंद भणगे, चंद्रशेखर जोशी, उदय वैद्य, पोपटराव धामणे, बाळासाहेब कोठुळे, आत्माराम शेवाळे, सौ सुरेखा घोलप आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..


stay connected