सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन; शालेय वक्तृत्वस्पर्धा निकाल घोषित
शिरूर कासार; दि. १५
सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन १६ ते १७ डिसेंबर २०२५ रोजी भास्कर चंदनशिव साहित्य नगरी, एकलव्य विद्यालय, शिरूर कासार येथे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने बीड जिल्हास्तरीय ऑनलाईन शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.
सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन निमित्ताने आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील ११३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पाचवी ते आठवी गटामध्ये प्रथम- भार्गवी कैलास तुपे, एकलव्य विद्यालय, शिरूर कासार द्वितीय- श्रावणी भागवत ढाकणे जिल्हा परिषद प्राथ. शाळा मिरकाळा ता. गेवराई, तृतीय- यशश्री महादेव नेहरकर, जि. प. प्रा. शा. पिसेगाव, केज, चतुर्थ- ऋतुजा रमेश केदार जि. प. प्रा. शा. दहिफळेवस्ती ता. शिरूर उत्तेजनार्थ- भाग्यश्री अहिरे, अंबाजोगाई व सई जाधव, संस्कार विद्यालय, बीड यांनी क्रमांक मिळवला. तर गट नववी ते बारावीमध्ये प्रथम- वैष्णवी डाके, संस्कार विद्यालय, बीड, द्वितीय- कार्तिकी नंदू अनाप, एकलव्य विद्यालय, शिरूर कासार तृतीय- आराध्या विठ्ठल गीते, कालिकादेवी माध्यमिक विद्यालय, शिरूर कासार, उत्तेजनार्थ- सानिका जाधव, जालंदर विद्यालय, रायमोहा व संस्कृती जायभाये, एकलव्य विद्यालय, शिरूर या विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन दि.१७ रोजी संमेलनस्थळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव, प्रा.निलेश पोकळे, पत्रकार गोकुळ पवार, मधुकर केदार, शिवचरित्रकार कैलास तुपे यांनी परिश्रम घेतले.


stay connected