कड्यात रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य ; नागरिक संतप्त

 कड्यात रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य ; नागरिक संतप्त 



कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील नियतकालिक धान्य वितरणात गंभीर त्रुटी उघड झाल्या असून नागरिकांना गव्हाऐवजी किडलेली व अळ्या -जाळ्या सोनकिड्यांनी भरलेली ज्वारी वितरीत केल्याचा प्रकार समोर आला आहे.धान्याच्या गोण्यात पांढरा फुफाटा, दुर्गंधी सह अळ्या -जाळ्या सोनकिड्यांची वाढ स्पष्ट दिसून येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रशासनाकडून गहू देण्याचे आदेश असतांना प्रत्यक्षात निष्कृट दर्जाची ज्वारी कशी आली ? हा माल कोणत्या गोदामातून पाठविण्यात आला? पुरवठा करणाऱ्या एजन्सीची जवाबदारी कोणाची, यासंदर्भात नागरीकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी, निकृष्ट धान्य पुरवठादारांवर कठोर कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यांची जवाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. निष्कृट दर्जाचे धान्य वाटप करने हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने सार्वजनिक वितरण प्रणाली वरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे कडा सह आष्टी तालुक्यात संतापाचे वातावरण असून नागरिकांची एकच मागणी जवाबदारांवर कारवाई करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.