Bodh katha बोध कथा - Ankush Shingade

बोध कथा




 १} विमान


 प्रकाशनं एकदा विमान पाहिला. विचार केला आकाशी उडीन. त्यानं एक कागदाचा विमान बनवला. त्याला पंख लावले. त्यात एका माणसाचे चित्र ठेवले. नाव दिलं प्रकाश. आता रोजच प्रकाश आकाशात उडू लागला. बोध- स्वप्न मोठं असेल तर ते पुर्ण होणारच. 


२} लबाड उंदीर 


एकदा एका उंदरानं भीतीपोटी सापाशी मैत्री केली. म्हणे, "मी तुला मदत करणार." एवढ्यात शिकारी आला. त्यानं सापाला पकडलं व तो त्याला नेवू लागला. त्यानं बराच आवाज लावला. परंतु उंदीर मदतीला आलाच नाही. साप निघून गेल्यावर उंदीर आनंदानं नाचू लागला. बोध- लबाडाशी मैत्री करु नये. 


३} खरी मैत्री 


गंपूला पोहणे कठीण वाटायचे. त्यानं एका बेडकाशी मैत्री केली. बेडूक म्हणाला, "गंपू माझ्याकडे ये. मी पोहायला शिकवतो." गंपू बेडकाकडे गेला आणि पोहणे शिकला. बोध- चांगल्या मित्राचीच संगत खरी लाभदायक असते. 


४} चॉकलेट


 चिंकी चॉकलेट खाणारी मुलगी. ती फारच चॉकलेट खायची. आज तिनं चॉकलेट खाल्ली नव्हती. चिंकीनं एकदा स्वप्न पाहिलं. स्वप्नात अळी आली. म्हणाली, " मी तुझ्या दातातील अळी. मला आज चॉकलेट मिळालं नाही. चॉकलेट दे. नाहीतर मी तुलाच खाते." थोड्या वेळाचा अवकाश. तिला जाग आली व तिनं त्या दिवसापासून चॉकलेट खाणे सोडले. बोध - चांगल्या वस्तू खाणे आरोग्याला फायदेशीर असतात. 


५} खरा आनंद 


रिंकीचं दूध पिवून झालं नव्हतं. एवढ्यात मिंकी मांजर आली. तिला लहान लहान पिल्लं होती. तिला भूक फार लागली होती. रिंकीला दया आली व तिनं तिला दूध दिलं. दूध पिवून मिंकी मांजर आनंदानं झोपी गेली. त्याचा फार मोठा आनंद रिंकीला झाला होता. बोध- दुसर्‍यांना मदत करण्यातच खरे समाधान लाभते. 


६} कावळ्याची मदत 


काल एक कावळा बराच तहानलेला व उपाशी होता . आबानं त्याला वडापाव दिला. आज आबा म्हातारे होते व उपाशी होते. कावळ्यानं ते पाहिलं. आज त्याच कावळ्यानं आबाला वडापाव आणून दिला होता. बोध - चांगले कर्म असल्यास देव कोणत्याही रुपात आपल्या संकटात धावून येतो. 


७) मदत


 ढंपू गाढव गवतावर विचार करीत चरत होते. विचार होता, आपण माणसाला मदत करायची नाही. आपण मदत करतो, तरी ते बेईमान होतात. गाढवानं मदत करणं बंद केलं. मग माणसानंही त्याला मदत करणं बंद केली. एवढ्यात पावसाळा आला. गाढव ओलेचिंब झालं. आता त्याला माणसाची आठवण येवू लागली होती. बोध- कोणी केलेले उपकार विसरु नयेत. बोध- आपण एखाद्याला केलेली मदत व्यर्थ जात नाही. 


८) शान


 चितू सिंह जंगलचा राजा होता. तोच जंगलाची शान होता, आता जंगल स्मशान झाले होते झाडं शेतीसाठी मकानासाठी रस्त्यासाठी कटली होती. आता जंगलात झाडं नव्हती. पाऊस पाणी पडत नव्हते. जंगलात प्राणी राहात नव्हते. चितूनं विचार केला, त्यानं गणू माकडाशी मैत्री केली गणूनं झाडं लावली. जंगल हिरवंगार झालं. जंगलात प्राणी आले. पक्षी आले. मोर नाचायला लागले. सिंहोबाची शान वाढली. अन् सारेच कसे आनंदी झाले. म्हणून झाडे आपण लावूया. पाऊस पाणी बोलवूया बोध- झाड म्हणजे पर्यावरणातील एक महत्वाचा घटक. म्हणून झाडं लावावीत. 


९) परीवर्तन 


रवी पतंग उडवीत होता. एक दिवस त्यानं चिमण्यांचा चिवचिवाट सुरु ऐकला. एक चिमणी म्हणाली, "काय बाई लोकं, त्यांना कळत नाही की पतंगानं चिमण्यांचा जीव जातो." ते बोलणं जवळच उभा असलेला रवी ऐकत होता. त्यानंतर तो हसला व त्यानं पतंग उडविणं बंद केली. बोध - लोकं गोष्टी करीत असतात. चांगल्या तेवढ्या ऐकाव्या.


 १०) परीक्षा 


गरुडराणी झाडाच्या फांदीवर उंचावर बसून होती. तिचा पती पिल्लांची देखभाल करण्यासाठी घरट्याच्या खाली ताटकळत होता. तिनं जमीनीवर पाहिलं, एक माणूस दारु पिऊन आपल्या पत्नीला मारत होता. तशी ती खाली येवून त्याच्या पत्नीला म्हणाली, "वेड्या बाई, माझ्यासारखी परीक्षा घेतली असती, तर असे घडलेच नसते." त्या महिलेनं ऐकलं व घटस्फोट झाला. बोध- कोणतीही गोष्ट करण्याआधी ती चांगली की वाईट हे पडताळून पाहावे.


 ११) निरीक्षण 


मंजूळा पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी. मुलगी फारच हुशार. परंतु दुर्दैवानं आईबाप मरण पावले. शिक्षण गेलं. मंजूळा असहाय्य झाली. शिकण्याची इच्छा मारली गेली. परंतु ती निरीक्षण करायची. झाडं, फुल, फळ, पक्षी यांच्याशी बोलायची. निसर्गात रमायची. त्यातून ती शिकली. तिनं शेतकऱ्यांचं जीवन पाहिलं. खंत वाटली व कालानुकालीक मोठी होताच तिनं एक यंत्र काढलं. ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत होता. बोध:- केवळ शाळेत शिकणं महत्वाचं नाही. परीसरही जास्त शिकवून जातो.


 १२) सुप्त गुण 


मृग महिना लागला होता. पावसाची सर आली होती. बाबूराव मातीच्या घरात होता. तशी भिंत पडली व त्यात बाबूरावचे दोन्ही पाय गेले. परंतु बाबूरावनं हिंमत हारली नाही. बाबूराव विचार करु लागला. आपण काहीच करु शकत नाही. तशी त्याला एक मुंगी म्हणाली, "वेड्या कायर माणसा, मी मुंगी, निसर्गातील लहान जीवन. मोठमोठी पहाड चढते." बाबूरावनं तिचं ऐकलं. तिचा त्याला हेवा वाटला व त्यानंही निर्धार केला. मी एवरेस्ट चढणार. आज त्यानं एवरेस्ट शिखर पादाक्रांत केलं होतं. बोध:- प्रत्येकात सुप्त गुण असतात. त्यासाठी जाबवंतासारखा गुरु हवाच.


 १३) ऑपरेशन


 आई बाजारातून घरी आली. प्रत्येकाला खाऊ दिला. ज्यातून लहानग्या आरुषीला विषबाधा झाली. आरुषीचं पोट दुखू लागलं. त्यानंतर तिला दवाखान्यात नेलं. एक्सरे काढला गेला व निदान झालं. तिच्या पोटात घासणीच्या ताराचा लहानसा तुकडा गेला होता. तो ऑपरेशननं बाहेर निघणार होता. ऑपरेशन झालं व तुकडा बाहेर निघाला. आईनं सुस्कारा सोडा. देवाचे आभार मानले. बरं झालं की अनर्थ टळला. बोध:- बाहेरचं जीनस विचारपुर्वक खावे.


 १४) बोलणं


 मुलं बोलत होती. ते पाहून सर म्हणत होते, 'शांत बसा.' मुलं ऐकत नव्हती. सरानं बोलणंच बंद केलं. बोध- कोणाला सुधारायचे असेल तर आपणच आधी सुधारावे.


१५) जन्म


 अनुसयाची आजी आजारी होती. तिला आजीची चिंता होती. वाटत होतं आजी जाणार. वसंत आला होता. झाडांना पालवी फुटली होती. अनुसया बागेत खेळत होती. एवढ्यात एक पिकलं पान पडलं. तिला आश्चर्य वाटलं. एवढ्यात पान म्हणालं, "काय आश्चर्यानं बघतेय. अगं मी गळून पडणारच नाही तर नवीन पालवी येणार कशी?" पानानं म्हटलेले शब्द. अनुसयानं ऐकले व ती समजली की एक जीव जातो. मगच नवीन जीव जन्म घेतोय. आपली आजी जाणार. परंतु त्या जागेवर नवीन जीव जन्म घेवून येणार. बोध - मृत्यू हेच जीवन आहे. 


१६) आधार 


गुणी कोकीळा झाडावर बसून रडत होती. ते रडणं होतं, गाणं नव्हतं. तिला तिचा पती आज वात्रट बोलला होता, म्हणाला होता की तू ऐतखाऊ आहेस. सुंदर नाहीस. मी बरा आहे. म्हणून तुझी शान आहे. पावसाळा आला होता. तिच्या पतीला थंडी वाजत होती. कोकीळेनं ते पाहिलं. तिनं रडणं सुरु केलं. भाषा समजत नसल्यानं इतरांना ते गाणं वाटलं. ते धावत आले. त्यांचं मनोरंजन झालं. बदल्यात त्यांनी तिला मदत केली व तिच्या पतीचा जीव वाचवला. बोध- कोणताही व्यक्ती स्वभावाने वाईट नसतोच. 


१७) मैत्री 


गंपू उंदीर बिळात होता. त्याला विचार होता. आपण जगायचं कसं? बाहेर निघालो तर मांजरीची भीती आणि बिळात असलो तर सापाची भीती. एवढ्यात त्याला एक उपाय सापडला. त्यानं काजव्याला आमंत्रीत केले. आता तो भयमुक्त झाला. आता तो आणि काजवा सुखात बिळात राहू लागले होते. बोध- निर्भीडपणा हाही एक अलंकार आहे. 


१८) सुधारणा 


गजू बगळा पाण्यात उभा होता. त्याचे डोळे मिटले होते. मात्र मासोळ्यांना माहीत होतं की तो आंधळ्याचंच सोंग करतोय आणि तो तसाच करायचा व वागायचाही. एकदा एका खेकड्यानं बगळ्याचे पाय पकडले व तो खोल पाण्यात खेचू लागला. तोच बगळा 'मदत करा, मदत करा' असे ओरडायला लागला होता. त्यातच बाकी मासोळ्यांना त्याची मजा वाटायला लागली होती. त्यांना वाटत होते की या बगळ्याने त्याचे अख्खे कुटूंबचे कुटूंब खाल्ले. तोच एक वयोवृद्ध मासोळी म्हणाली, "चला धावायला पाहिजे." वयोवृद्ध मासोळीनं त्याला मदत करावी म्हटलं. परंतु कोणीच सरसावलं नाही. तोच ती पुढं गेली व खेकड्याला इजा करु लागली. ते पाहून बाकीच्याही मासोळ्या धावल्या व बगळ्याला बंधमुक्त केलं. आता बगळ्याला आपली चूक समजली होती व त्यानं आता मासे पकडणं बंद केलं होतं. बोध- कुणाचेही कोणी वाईट करु नये.


 १९) चुकीवर पश्चाताप


 अंशू नावाचा एक माकड. माकड फार शहाणा होता. एकदा अति शहाणेपणानं त्यानं संतू आणि बंतू मांजरीचा वाद सोडवला केळी फस्त करुन. मग मांजरांना केळीचा एकही कण न मिळाल्यानं ते बदला घेण्याची वाट पाहात होते. अशातच एक दिवस मांजराची शेपूट ओंडक्यात अडकली. माकड ओरडू लागलं. माकडाचं ओरडणं मांजरींना ऐकायला आलं. त्या आल्या. त्यांनी माकडाची फजिती पाहिली व त्याला आठवण करुन दिली. त्यानंतर माकडाला पश्चाताप झाला व त्यानं माफी मागितली. ते पाहून मांजरांनी त्याला मदत केली. चूक झाली होती. ती चूक लक्षात येताच माकडानं बरीच केळी मांजरांना चारली होती. बोध- वात्रट वागण्यापुर्वी आपल्या बाळाचा विचार करावा.


२०) सुगीचे दिवस


 झाडावर पक्षी बसले होते. पाऊस येत नव्हता. तसा दुष्काळ पडला होता. दुष्काळ जसा गावात होता. तसा जंगलातही होता. झाडं रडत होती. आपण संपतो की काय? परंतु ते रडणं एका चिमणीला दिसलं. चिमणीनं कारण विचारलं, तेव्हा झाड म्हणालं, "काय करावं. पावसानं दगा दिला. पाणी नाही प्यायला. आम्ही जगावे कसे?" चिमणीनं ऐकलं. सगळ्यांना सांगीतलं. कोणी ऐकेना. तेव्हा ती स्वतःच उडत गेली. तिनं तळं शोधलं. चोचीत पाणी आणलं. चोचीत पाणी तरी किती येणार. परंतु ती कृती इतरांनी पाहिली. त्यांनी चिमणीला सहकार्य केलं. झाडं हिरवीगार झाली. तसा दुष्काळ संपला आणि सुगीचे दिवस सुरु झाले. बोध- संकट येणारच. जो संकटात मदत करतो. तोच खरा मित्र असतो. 


२१) उपकार 


आनंद आनंद देणारा मुलगा. एकदा तो आजारी पडला. त्याच्या आईवडीलांनी बरेच उपाय केले. परंतु तो बरा होत नव्हता. ते पाहून त्याच्या आईवडीलांना चिंता पडली. एकदा ते एका झाडाच्या खाली बसले होते. निराश होते. ते पाहून झाडानं विचारलं, "काय झालं?" त्यावर त्यानं आपबीती सांगीतली. तसं झाड म्हणालं, "वेड्या माणसा, "माझ्या पानाचा रस दे त्याला. तो लवकरच बरा होईल." आनंदच्या पालकांनी तसंच केलं. आनंद ठणठणीत बरा झाला. त्यानं झाडाचे उपकार मानले व झाडं लावायला सुरुवात केली. बोध- चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळत असते. 


२२) लाजाळूपणा 


रिंकू पोपट फार लाजाळू होता. तो लाजाळूपणानं अजिबात बोलत नव्हता. तसं त्याचं वागणं पाहताच मालकानं त्याला विकायचं ठरवलं. आता रिंकू घाबरला. दुसरा मालक कसा मिळतोय. याचा त्याला विचार येवू लागला. तोच त्याला ढंपी मनीमावशी म्हणाली, "रिंकू बोलायला सुरुवात करतांना पुढे मुर्ख लोक बसलेले आहेत असं समज व बोल. तू बोलू शकशील." रिंकूनं तसंच केलं व तो बोलायला लागला. आता तो मालकाच्या घरची गोड फळे खात असे. त्याचबरोबर तो गोडही बोलत असे. बोध- लाजाळूपणा हा घटक आपल्यातील दुर्बलता वाढवत असते.


 २३) सुधा अळी


 सुधा अळीनं विचार केला. माणसे आपल्याला चांगलं खायला देत नाही. उलट आपण पानं खाल्ली की तो पानावर औषधी फवारुन आपले वंशज मारुन टाकतात. आपण त्याला धडा शिकवायला हवा. एकदा तसा विचार करीत सुधा झाडाच्या फळात शिरली. त्यानंतर ती अतिशय गुप्तपणे माणसाच्या शरीरात. ज्यातून माणसांना रोग झाला व माणसे मरायला लागली होती. पाहता पाहता भरपूर माणसं मरण पावली होती. बोध- आपल्यापेक्षा कुणालाही कमजोर समजू नये. 


२४) सायकल 


सीमी श्वान सायकल चालवत होता. तो श्रीमंत होता. तशी रिमी मांजर गाडी चालवत होती. ती गरीबच होती व ती त्याला नेहमीच चिडवत असे. एकदा सीमी रस्त्यानं चालला होता. तेव्हा त्याला रिमी दिसली. ती रडकुंडीला आली होती. गाडी ढकलता ढकलत नव्हती. तसं सीमीनं कारण विचारलं. रिमी म्हणाली, "काय करु, गाडीत पेट्रोल नाही. म्हणून ढकलतोय. परंतु थकल्यानं जीव रडकुंडीला आलाय." सीमीनं तिला सायकल चालवण्याचा सल्ला दिला. आता रिमी सायकल चालवते व तिला काही समस्या आली तरी कोणताच त्रास होत नाही. बोध- आपल्याला झेपेल, तेच काम करावं. दुसऱ्याचा द्वेष करु नये.


 २५) भीती 


गायत्री लहान होती. तिनं एक दगड पाण्यात टाकला. तसे तरंग निर्माण झाले. तिला मजा वाटत होती. तशी ती त्या पाण्यात दगड फेकू लागली. त्यात तिला बऱ्याच जणांनी समजावले तर ती ऐकली नाही. एवढ्यात एक साप तिच्या मागे धावला व धावता धावता म्हणू लागला, "जर यापुढे तू दगडं मारली तर पहातच राहा." ते सापाचं बोलणं. त्या दिवसापासून घाबरलेली गायत्री आता पाण्यात दगडं मारत नाही. बोध- संस्काराची जपणूक करण्यासाठी कधीकधी भीती आवश्यक असते. 


२६) शिकणे


 फातिमा अभ्यास करीत नव्हती. तिचं मन लागत नव्हतं अभ्यासात. ती नापास होत होती. त्यातच तिचे वडील परेशान झाले होते. काय करावं सूचत नव्हतं. एवढ्यात त्यानं पाहिलं की एक मुंगी भिंत चढत आहे व पडत आहे. त्यातच त्याला माहीत होते की ती भिंत चढणार. तेच दृश्य त्यानं आपल्या मुलीला दाखवले. मुलीनं त्या दृश्याचं निरीक्षण केलं. त्यानंतर त्या मुंग्या भिंत चढून जाताच तो आपल्या मुलीला म्हणाला, "बघ ही मुंगी. तुझ्यापेक्षाही लहान आहे. तरीही ही एवढी मोठी भिंत चढते आणि तू साधी परीक्षा पास होत नाही." फातिमानं ते ऐकलं. तिला वाईट वाटलं. त्यानंतर ती अभ्यासाला लागली. त्यानंतर ती अभ्यासाचे मोठमोठे पर्वत चढू लागली होती. बोध- मुक्या प्राण्यांपासूनही बरंच काही शिकता येतं.


 २७) काम 


अपर्णा घाईघाईनं दुकानात पोहोचली होती. तिला आई ओरडली होती सामान आणण्याबद्दल. कारण ती काम ऐकत नव्हती. तशी तिनं चिठ्ठी दिली. अपर्णानं सामान घेतलं व तिनं ते न मोजता घरी आली. घरी आईनं सामान तपासलं. त्यात एक सामान नव्हतं. तसं आईनं अपर्णाला विचारलं. अपर्णा काहीच बोलली नाही. तशी आई अपर्णाला घेवून दुकानात गेली व दुकानात त्या वस्तूबद्दल विचारलं. परंतु दुकानदार मान्य झाला नाही. त्यानंतर आई निराश होवून घरी आली. तिनं अपर्णाला म्हटलं, "अपर्णा, पाहा, लोकं असेच मुर्ख बनवतात. म्हणून मी तुला रोजच दुकानात पाठवते. त्याचं कारण आहे तू शिकावं व तुला पुढे मोठमोठे व्यवहार करता यावेत." ते आईचं बोलणं. अपर्णा काय समजायचं ते समजली. आता ती रोजच आईनं काम सांगताच दुकानात जात असे व हुशारीनं व्यवहार करीत असे. आता ती एवढी हुशार बनली होती की कोणीही तिला व्यवहारात मुर्ख बनवीत नव्हता. बोध- आईचा राग धरु नये. 


२८) पश्चाताप 


पुढे दूध ठेवलं होतं. पिंकी मांजर दूध पिणार होती. तिला भूक फार लागली होती. इतक्यात तिचं लक्ष एका उंदरावर पडलं. उंदीर खेळत होतं. पिंकीनं उंदरावर झडप मारली. उंदीर पळून बिळात गेलं. अशातच दुधाचं पातेलं तिच्या झडप घालण्यानं पडलं. दूध वाया गेलं होतं. पिंकीच्या हातून शिकार गेली. दूधही गेलं. भूकही क्षमली नाही. आता पिंकीला पश्चाताप होवू लागला होता. बोध- लोभ ही अतिशय वाईट सवय आहे.


 २९) कसाई 


श्रद्धा बकरीला आपल्या बाळाची चिंता होती. बाळ मोठं झाल्यावर त्याला कापायला नेतील. ती काय करावे याचा विचार करीतच होती. अशातच कसाई आला. त्यानं तिच्या बाळाला पाहिलं. तिला राग आला. काय करावे सुचेनासं झालं. अशातच तिला आठवलं. आपल्याला शिंगे आहेत. शिंगाचा योग्य वापर करायला हवा. तिचा तो विचार. ती विचारच करीत होती. एवढ्यात श्रद्धानं आपली अगाढ ताकद लावून त्याच्या पोटात आपली शिंग खुपसली. तसा कसाई खाली पडला. रक्त वाहू लागलं व तो क्षणातच गतप्राण झाला. बोध- मुक्या प्राण्यांना त्रास देवू नये. 


३०) शाप


 अक्कू झाडू मारत होती. तिनं झाडू मारला, तेव्हा बक्कू मुंग्यांची रांग उध्वस्त झाली. ज्यात तिचा परिवार होता. त्यांनी तिला शाप दिला. "तुझाही परिवार असाच उध्वस्त होईल." काळ गेला व कालांतरानं आजारात अक्कूची चारही मुलं मरण पावली. आता तिला मुंगीचा शाप आठवत होता. परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. बोध- आपण दुसर्‍यांना त्रास दिला, तर प्रारब्धही आपल्याला त्रास देत असतो.


 ३१) हलकं काम 


मंगू झाडू मारत होता. तसं ते काम त्याच्या शेजारी राहात असलेल्या चंगूला हलकं वाटत होतं. तो सारखा तिला चिडवत होता. कारण चंगू सरकारी नोकरदार होता. काळ पालटला. तसा चंगू एका अफरातफरच्या खटल्यात अडकला. त्यात वाटोळं झालं व भीक मागायची पाळी आली. जेव्हा मंगूला हे माहीत झालं, तेव्हा त्यानं त्याला न चिडवता समजावून सांगीतलं की कोणतंही काम हलकं नसतंच. काही दिवसानं चंगूची परिस्थिती पालटली. परंतु आता तो आलेल्या परिस्थितीतून शिकला होता. तो आता कुणाला चिडवीत नव्हता. बोध- १) परिस्थिती आपल्याला सगळं शिकवून जात असते. २) कोणतेही काम हलके नसते.


 ३२) मोबाईल


 सुरेखाला आवडत होती पुस्तक. ती त्यातील गीतं वाचत होती. मात्र वसीम तिला हसायचा. त्याला वाटायचं की अलिकडील काळात मोबाईल बरा की तो एका क्लिकवर गोष्ट शोधून देवू शकतो. वसीमचं बरोबर होतं. कारण काळ बदलला होता. मोबाईलला जास्त महत्व आले होते. एकदा वसीमचा मोबाईलमुळं अपघात झाला. ज्यात डॉक्टरांनी सांगीतलं, "मोबाईल चालवायचा नाही. वेडा होशील. हं, पुस्तक वाचू शकतोस." आता त्याच्या सोबतीला पुस्तक होती. कारण तो मोबाईल चालवू शकत नव्हता. बोध- कोणत्याही गोष्टीला चिल्लर समजू नये. 


३३) मोगली 


मोगली जंगलात फिरत होता. त्याला सर्व प्राणी आवडत होते. कारण तो जेव्हा लहान होता. तेव्हा वाघाच्या भीतीनं त्याची आई त्याला सोडून निघून गेली होती. तेव्हा प्राण्यांनी त्याला वाढवलं. आज आईनं त्याला ओळखलं व नेवू पाहिलं. म्हटलं, "हे माणसाचं पोर. माणसाजवळच हवं." त्यावर उत्तर देत मोगली म्हणाला, "मी जंगलातच राहणार. कारण जेव्हा माझ्यावर वेळ वेळ होती. तेव्हा आपण पळून गेले होते. प्राण्यांनी मला लहानाचं मोठं केलं. तेच माझे माय अन् बाप आहेत." मायबापानं ते ऐकलं व मायबाप निघून गेले. बोध- संकटात जो मदतीस येतो. त्यालाच माय आणि बाप मानावे. 


३४) उपकार


 गीता आपल्या आईबरोबर रानात जात होती. ती गाय कधीकधी तिला दूध पाजत होती. आज गाय म्हातारी झाली होती व ती दूध देत नव्हती. ती जागची झाली होती. मात्र आज गीता तिला हिरवं हिरवं गवत द्यायची. एकदा तर गीताला तिनं मरणातून वाचवलं होतं. बोध- कोणाचे उपकार कधी विसरु नये.


 ३५) परतफेड


 सरु गाय गवत खात होती. तिचं लक्ष समोरच असलेल्या सापाकडे होतं. तो साप निपचीत पडला होता. तेव्हा त्याला भयंकर वेदना वाटत होत्या. तो कशानं तरी घायाळ झाला होता. सरु गाईनं त्याला पाहिलं व न घाबरता त्याच्या जखमा चाटल्या. ज्या जखमा तिच्या चाटण्यानं बऱ्या झाल्या होत्या. सरु आज म्हातारी झाली होती व तिच्या मालकानं तिला कसायाला विकलं होतं. तो तिला कापायला नेत होता. आज सापानं तिला पाहिलं. ओळखलं व त्यानं कसायाला दंश केला. ज्यात कसाई मरण पावला व गाईची सुटका झाली. बोध- माणसांपेक्षा केलेल्या उपकाराची जाणीव प्राणी ठेवत असतात.


 ३६) नावडता गणित


 श्यामलला गणित आवडत नव्हता. तिला भुगोलात गोडी होती. त्यानंतर मायबापाला काळजीचा प्रश्न पडला. श्यामल गणिताचा अभ्यास करीत नाही. तिला गणित कसा येणार. एकदा श्यामल अंगणात बसली होती. आकाशातील चांदण्या मोजत होती. तशी ती मोजता मोजता अडकली. तिला पुढे मोजता येईना. तेव्हा आई म्हणाली, "तुला जर गणित येत नसेल तर भुगोलही येणार नाही. तसेच इतर विषयही येणार नाहीत." श्यामल काय समजायचं ते समजली व त्या दिवसापासून ती गणिताचा जोरात अभ्यास करु लागली होती. बोध- सर्वच विषयाची जीवनात गरज पडत असते. तेव्हा ते शिकणे महत्वाचे. 


३७) शिक्षण


 सरला लहान होती. तेव्हा तिच्या आईनं भांडे घासणे शिकवले होते. कारण त्यावेळेस तेच आवश्यक होते. आज सरला मोठी झाली होती व ती आपल्या मुलांना अभ्यास शिकवीत होती. परंतु तिची मुलगी मोबाईल पाहणे शिकत होती. बोध- गरज लक्षात घेऊन वागावे.


 ३८) मृदुलाचा विचार 


जंगलतोड सुरु होती. मृदुला अस्वल विचार करीत होती. विचार होता जंगलाचा. जंगल नष्ट झाल्यावर आपण कुठे राहणार. तिचं बोलणं पावसानं ऐकलं. तशी पावसानं सुट्टी घेतली. गावात दुष्काळ पडला. लोकांची उपासमार होवू लागली. त्यानंतर लोकांना जंगलाचं महत्व कळलं व लोकांनी जंगलतोड बंद केली. बोध- झाड हे पर्यावरणाचे रक्षकच. 


३९) शांतता


 माणूस चांगला वागत नव्हता. तो दिशाहीन झाला होता. ज्याचा पावसाला राग आला. त्यानंतर पावसानं कहरच मांडला. दुष्काळ पडला होता. ओला दुष्काळ. शेती करपली होती. उपासमार होत होती. सुर्याला ते दिसलं. त्याला दया आली. त्यावर त्यानं आग ओकली. मग आकाशात ढगच दिसेनात. दोघांचं भांडण. माणूस देवाजवळ गेला. देवानं माणसाला, पावसाला व सुर्याला समजावले. तिघांनीही ऐकलं व त्यानुसार वागू लागले. आता मात्र सर्व शांत असते. मात्र मधामधात त्यांना ताव येतच असतो. बोध- भांडण करु नये.


 ४०) आळशी करुणा


 करुणा हुशार होती. परंतु आळशी होती. ती अभ्यास करायची. परंतु तोही आळस करुनच. ज्याची चिंता तिच्या मायबापाला पडली होती. एकदा करुणाच्या वडीलानं कोकिळेची कथा वाचली. कोकीळा आळशी असते. परंतु ती आपल्या गोड आवाजानं कावळ्याकडून काम करुन घेते. वडीलांनी करुणाला कोकिळेची गोष्ट सांगितली व सांगीतलं की आपला गुण जप. तरंच लोकं तुझं ऐकतील. लोकं अभ्यास करुन उच्च पदावर जातात. तेव्हाच त्यांना कुणीही साहेब म्हणतो व त्यांचं काम ऐकतो. ती कथा ऐकल्यावर करुणा काय समजायचं ते समजली व अभ्यास करु लागली. आज ती अधिकारी झाली होती व सर्व तिचं मुकाट्यानं ऐकून काम करीत होते. बोध- सर्वात मोठा अलंकार अभ्यास. ज्यानं आपलं जीवन सुशोभीत होत असतं.


 ४१) ताटातील अन्न 


निधी जेवन करीत होती व जेवन करतांना भरपूर अन्न सांडवत होती. ते पाहून माधवी म्हणाली, "किती सांडवतेस गं. तुला माहीत नाही. या अन्नासाठी शेतकरी किती मेहनत करतात ते." माधवी काय बोलते हे निधीला काही समजले नाही. एकदा ती आजोळी गेली व तिनं पाहिलं की तिचे आजोबा आजारी असतांनाही व बाहेर पाऊस सुरु असतांनाही शेतात जात आहेत. तिनं आपल्या आजोबांना प्रश्न विचारला. आजोबा म्हणाले, "बेटा, शेतावर मी गेलो नाही तर रानडुकरं शेतातील माल खावून ध्वस्त करतील. " निधीनं ते ऐकलं. तिला आजोबांच्या बोलण्याचा अर्थ कळला व त्या दिवसापासून तिनं जेवतांना अन्न सांडवणं बंद केलं होतं. बोध- ताटातील अन्न सांडवू नये. त्यासाठी बरेच श्रम करावे लागते.


 ४२) बिजू मुंगी 


बिजू मुंगी नंदू कासवीला आव्हान देत होती. तुझं अवाढव्य शरीर. तू खोल पाण्यात जात असशील. परंतु माझ्या काही कामाची नाही. कासवीनं ते ऐकलं व नम्रपणाने म्हणाली, "वेळ आल्यावर कळेल." एकदा एका माणसानं तळ्याच्या काठावरचं झाड तोडलं. ते पाण्यात पडलं व त्याचबरोबर पाण्यात बिजू मुंगीही पडली. ती गटांगळ्या खावू लागली. कासवीनं ते पाहिलं. तिला दया आली व तिनं आपल्या पाठीवर बसवून तिला बाहेर काढलं. आता मुंगीला स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप होवू लागला होता. बोध- जीवन जगत असतांना कोणीही कोणाला तुच्छ समजू नये. 


४३) गजू हत्तीचा गर्व 


गजू हत्तीला त्याच्या ताकदीचा गर्व झाला होता. त्याला वाटत होते की जगातील तोच असा पहलवान आहे. एकदा गजू रस्त्यानं जात असतांना त्यानं पाहिलं की एक लहानशी मुंगी आपल्यापेक्षा जास्त वजनाची वस्तू आपल्या तोंडात घेवून भिंत चढत आहे. ते पाहताच त्याचा गर्वहरण झाला व त्या दिवसापासून त्यानं गर्व करणे सोडून दिले. बोध- कोणालाही आपल्यापेक्षा लहान समजू नये. 


४४) सुंदर शिंगे 


श्यामल हरिण फार सुंदर दिसत होतं. त्याची शिंगही सुंदरच होती. त्याला वाटत होतं की आपल्याएवढं सुंदर जगात कोणीच नाही. एवढ्यात एक माकड त्याला दिसलं. ते माकडाला चिडवत म्हणालं, "तू काळतोंडाचा आहेस. तुला कोणीही चांगलं म्हणत नाही. माझ्याकडं पाहा. मी सुंदर आहे त्यापेक्षा माझी शिंगे फारच सुंदर आहेत." माकडानं ते ऐकलं. तेव्हा माकड म्हणालं, "सुंदरचा तुला गर्व गर्व झाला ना. ही शिंगेच तुझा जीव घेतील." एकदा त्याच हरिणाच्या मागं एक वाघोबा लागले. हरिण पळायला लागलं. परंतु पळतांना त्याची शिंग झाडाच्या वेलीला अडली व विनाकारण हरिणाचा जीव गेला. बोध- सुंदर शिंगे नाहीत, मन असतं.


 ४५) हुशार माकड 


निलू लांडगा आज म्हातारा झाला होता. त्याला शिकार मिळत नव्हती. त्यानं एका काळ्या तोंडाच्या माकडाला पाहिलं व म्हणाला, "तू जर माझ्याकडे येशील तर मी तुला सुंदर होण्याची कला शिकवेल." माकड भोळं होतं. परंतु ते हुशार होतं. ते त्याच्याकडे गेलं. तसं त्या लांडग्याने त्याला पकडलं व म्हणाला, "मी तुला मुर्ख बनवलं. आता मी तुला खाणार." माकड विचारात पडलं. विचार केला की आपण फसलो. निसटायचं कसं? तसा विचार करताच त्याला एक युक्ती सापडली. ते म्हणालं, "अरे, तू मला खाणार. या बेचव शरीराला. मला माहीत असतं तर मी मीठ लावून आलो असतो शरीराला. मग मी चवदार लागलो असतो. म्हणशील तर मी लावून येतो मीठ अंगाला." लांडगा मुर्खच होता. त्याला वाटलं की माकड खरं बोलतंय. त्यानं त्याला सोडून दिलं. त्याचबरोबर माकड झाडावर चढलं व म्हणालं, "वेड्या लांडग्या. तू वेडाच आहेस. अरे मीठ कधी अंगाला लावण्याची वस्तू आहे काय? आता राहा पश्चाताप करीत." माकड पळून गेलं व लांडगा पश्चाताप करीत बसून होता. बोध- आपल्यापेक्षाही हुशार माणसं जगात असतात. 


४६) बदला


 सिताफळाचं झाडं धोतऱ्याच्या झाडाला बोललं, "आपण माणसाच्या कामात येतो. तरीपण माणूस आपला जीव घेतो. आता आपण माणसाच्या कामातच यायचं नाही." धोतऱ्यानं त्यावर विचार केला व ते बदला घेण्याची वाट पाहू लागलं. एक दिवस एका माणसानं धोतऱ्याला शिवपिंडीवर वाहायला तोडलं. परंतु त्या धोतऱ्यानं डाव साधला व ते जेवनात पडलं. ज्यातून अनेक माणसं मरण पावली होती. बोध- उपकार कधी विसरु नयेत. 


४७) उंदराची मदत 


चिमणा पतंगाच्या धाग्यात फसला होता. तो तळपत होता. अशातच चिऊताई आली. तिनं धागे कुरतडण्याचा प्रयत्न केला. तिला ते जमले नाही. ती उंदराकडं गेली. म्हणाली, "उंदीरदादा, मला एक मदत कर. माझ्या पतीच्या तोंडात अडकलेले धागे काढ." उंदरानं होकार दिला. ज्यात चिमणा वाचला. थोड्याच दिवसात उंदीर सापाच्या तोंडात सापडला. चिमणीला त्यानं आवाज दिला थोड्याच वेळात चिमणी सर्व चिमण्यांना घेऊन आली. त्यांनी चिवचिवाट केला व अशाप्रकारे उंदराचा जीव वाचला. बोध- आपण कोणाला मदत केली तर तोही एक दिवस आपल्याला मदत करतोच. 


४८) भुकंप


 नकू मुंगी बोलत होती. सांगत होती की भुकंप येणार. परंतु तिला लहान समजून तिचं कोणी ऐकत नव्हतं. मुंगीनं मात्र घर सोडलं. भुकंप आला व सगळे नेस्तनाबूत झाले. फक्त त्या गावातील नकू मुंगीच वाचली होती. बोध- मुक्या प्राण्यांना संकटाची जाणीव आधीच होते. त्यांचे संकेत समजून घेवून वागावे. संकट टळेल.


 ४९) पूर 


गावात नदी होती. पाऊस येत होता व देवकी सांगत होती. नदीला पूर येणार. देवकीचं कोणीच ऐकलं नाही. त्यांना वाटलं, आमचं चांगलं सिमेंटचे घर. ध्वस्त कसं होणार. नदीला पूर आला. पुरानं पुरेसा वेळच दिला नाही. त्यातच झाडासकट दोनचार मजली घरही आपल्यात ओढून नेली. पूर थांबला होता. परंतु आता गावच्या ठिकाणावर गाव दिसत नव्हतं. केवळ चिन्हं आणि आठवणी उरल्या होत्या. बोध- भुकंप व पाऊस यांच्याशी कोणी लढाई करु नये. 


५०) आत्मनिर्भरता


 आस्थाने इशिकाला म्हटलं, "आपण शाळेत जावू. आपला फायदा होईल." इशिकानं ते ऐकलं नाही. काळ ओसरला. इशिका मोठी झाली. आज आस्था सरकारी नोकरीवर होती व कुणावर अवलंबून नव्हती आणि इशिका मातीचे ढेकळं फोडत दुसऱ्यावर निर्भर राहून जीवन जगत होती. बोध- माणसानं आपल्या पायावर उभं राहता येईल असं कार्य करावं. 


५१) नदीची लेकरं 


नदी वाहात होती व नदीची दोन्ही लेकरं भांडत होती. दोन्ही लेकरं आईजवळच राहू पाहात होती. झाड उंच होतं व ते आपल्या सोबत राहात असलेला लहान भाऊ शेवाळाला हसत होतं. टिंगल करीत नेहमी म्हणत होतं, "बघ, मी किती उंच उंच आहे व मला जग बघता येतं. अन् तू पहा, बुटूकला." शेवाळाचा त्यात सतत अपमान होत होता. त्याचं शेवाळाला वाईट वाटत होतं. एकदा पूर आला व त्यात झाड खाली पडून दूर निघून गेलं. शेवाळ आजही नदीजवळच होतं. कारण नदीआईनं गर्व करणाऱ्या लेकराला दूर हाकलून टाकलं होतं. बोध- चांगली माणसं सर्वांना आवडतात. 


५२) गुलाबाचं देखणेपण


 व्हॅलेंटाइन दिवस आला होता. एक गुलाब फार उदासीत होतं. कारण त्याचे शेजारी मित्र तरुण व टवटवीत असल्यानं ते केव्हाचेच संगत सोडून निघून गेले होते आणि तो थोडासा टवटवीत व देखणा नसल्यानं त्याला कोणीही नेलं नव्हतं. सायंकाळ झाली होती. एक म्हातारा व्यक्ती आला. त्यानं त्याला घेतलं. गोंजारलं व तो चालता झाला. ते गुलाब रस्त्यानं त्या म्हाताऱ्यासोबत चालत होता असतांना अनुभवत होता की रस्त्यावर त्याचे मित्र पडले आहेत. त्यावर कोणीतरी पाय देत त्याला तुडवून चालले आहेत. तसं त्याचं त्याला फार दुःख झालं व स्वतःला आणखी दुःख अनुभवावं लागणार असं त्याला वाटलं. तोच तो म्हातारा एका मंदिरात गेला. त्यानं त्याच कोमेजलेल्या फुलाला देवाच्या पायावर अर्पण केलं व नतमस्तक होवून तो माघारी फिरला. आज त्या फुलाला धन्य वाटत होतं व ते आपल्या देखणं नसल्याबद्दलही हळहळत नव्हतं. बोध- कधीकधी गुण महत्वाचे असतात. देखणं असणं तेवढं महत्वाचं नसतं.


 ५३) प्रेरणा


 चिमणीच्या मुलांना पंख फुटले होते. परंतु ती उडत नव्हती. सकाळ झाली होती. चिमणी बाळाला म्हणाली, "बेटा आत्मनिर्भर व्हायला शिक." त्यानंतर चिमणी उडून गेली. सायंकाळ झाली होती. चिमणी परत आलीच नाही. भूक फार लागली होती. अशातच सकाळचं आईचं बोलणं आठवलं. सकाळ झाली होती व इवलीशी पिल्लं उडायला लागली होती. बोध- प्रयत्न केला तर पर्वतही पार करता येतो. परंतु त्यासाठी प्रेरणा महत्वाची.


 ५४) चांगुलपण


 जितू साप उदास बसला होता. त्याला भूक फार लागली होती. एवढ्यात त्याला आठवलं. उंदराची पिल्लं शेजारलाच आहेत. आपण त्यांना खावून आपली भूक क्षमवूया. सापानं तसा विचार करताच ते त्या बिळाजवळ गेलं. तिथं उंदीर बाई पिल्लाला झाकून बसली होती. ती पिल्लाच्या रक्षणाच्या पावित्र्यात होती. तसंच त्यानं पाहिलं की उंदराच्या पिल्लाचे डोळेही उघडलेले नाहीत. सापानं विचार केला. विचार केला की ही खाण्याची वेळ नाही. आपण मागं परतायला हवं. तसा खाण्याचा विचार करणारा साप ते पाहून मागे परत फिरला होता. बोध- शहाणी माणसं ही चांगला मानसिकतेचा विचार करीत असतात.


 ५५) बी काव्या वेडी होती. तिनं बी लावलं. त्याला फळं आली. बोध- काही वेडी माणसंही फार मोठं काम करुन जातात.


अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.