गांधी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

 *गांधी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न* 



कडा: येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण व माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे  कार्याध्यक्ष श्री. कांतीलालजी चानोदिया होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. नवनाथ पडोळे सर, सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजीत लुनिया, बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गफार सय्यद सर, माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री. रामप्रसाद देशमुख, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री धनंजय कोकणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर भंडारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक प. पू. श्री. अमोलक ऋषीजी म. सा. व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून तसेच विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. भंडारी यांनी करताना संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रम, त्याचप्रमाणे संशोधन केंद्राबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजीत लुनिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या शताब्दी महोत्सवाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच विद्यार्थ्यांना केवळ पदवी व पदव्युत्तर शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता कौशल्य विकास साधून आर्थिक प्रगती साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री. रामप्रसाद देशमुख यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गफार सय्यद यांनी विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य विकसित करण्यावर भर देण्याचे सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. श्री नवनाथ पडोळे सर यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वाय. बी. रसाळ यांनी व आभारप्रदर्शन डॉ.अमोल कल्याणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.