*"वक्फच्या" आडून धार्मिक उन्माद!*
✍🏻
*युन्नूस तांबोळी, अकलूज.*
वक्फ सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर बंगालमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली.आधीच्या राजवटींनी इस्लाम धर्मियास "वक्फ"च्या नावाखाली अनावश्यक जमिनी बहाल केल्या.सबब मुस्लिमांचे लांगुलचालन थांबायला हवे,हे बहुसंख्यांचा मनी उतरवले, आणि ते काम आम्ही केले.
भाजपाच्या अजेंड्यावर असलेल्या अयोध्येत राममंदिर बांधणे, काश्मीरमधील ३७०कलम रद्द करणे, आणि आता वक्फ बील मंजूर करणे अशा एकापाठोपाठ एक घटना भाजपाने संसदेत मंजूर करून घेतल्या.
सध्या बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न समाजाला भेडसावत असताना धार्मिक उन्माद निर्माण करण्यात धन्यता मानण्यात येते.समाजात जातीय तणाव निर्माण करुन आपली पोळी भाजण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.नवनवीन विषय उकरून दोन धर्मियांना भडकावण्याचे प्रयत्न थांबले पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्व हातखंडे वापरून मार खाल्लेल्या भाजपाला यावेळी काहीही करून सत्तेवर यायचे आहे.बिहार , उत्तरप्रदेशच्या निवडणूकां महत्त्वाच्या आहेत.सतत धार्मिक ध्रुवीकरण करून दोन धर्मात जातीय तेढ निर्माण सत्तेच्या शिड्या चढाईच्या आहेत.
मुर्शिदाबाद येथील हिंसाचार तेथील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या राजकारणाचा तर भाग नाही ना अशी शंका येते.ममता बॅनर्जी यांनी तर राज्यात वक्फ कायदा नहीं चलेगा असे सांगून भाजपाला फटकारले.सध्याच्या वातावरणात बेरोजगारी, दहशतवाद, नक्षलवाद,असे असंख्य प्रश्न असताना भाजपाने वक्फ बिलाचा अट्टाहास कशासाठी करायचा.
वक्फ बिल मंजूर करून मुस्लिमांना डिवचले, आणि बहुसंख्यांना खुश केले.सध्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जातीय तेढ निर्माण करणारे विषय सातत्याने काढले जातात.दोन धर्मियांत फुट पाडणे देशासाठी घातक आहे याचा गांभीर्याने झाला पाहिजे.
stay connected