*उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताचे आमदार रोहित पवारांकडून बँनर, जामखेड शहरात चर्चेला उधाण ...*
*जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण* )
जामखेड - उपमुख्यमंत्री अजित पवार व कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे काका पुतणे पण दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार 1243 मतांनी विजयी झाले तेव्हा रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आशिर्वाद घेतले तेव्हा अजित पवार म्हणाले होते की. बेट्या माझी सभा झाली असती तर काय झाले असते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जामखेड मध्ये नेमकं घडतंय काय? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर येत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन पक्ष प्रवेश ;शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. १७) जामखेड मध्येआयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा साठीअजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली .
त्यांच्या जोडीला राम शिंदे, विखे-पाटलांचीही हजेरी राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसत आहे. दरम्यान, अजित पवार जामखेड मध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागले आहेत. त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मित्र परिवाराकडून स्वागत अशा नावाने अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. तसेच बॅनरवर रोहित पवार यांचा फोटो आणि उल्लेख आहे. कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत स्वागत, आशा आशयाचे बॅनर लावले आहेत.
अशा बॅनरमुळे शहरात वेगवेगळे तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. विशेष म्हणजे आता या कार्यक्रमासाठी सभापती प्रा राम शिंदे अध्यक्ष असणार आहेत.
*सत्तेत सहभागी होण्यासाठी आ. रोहीत* *पवार यांची दिशा?*
-------------
उपमुख्यमंत्री अजित पवार व आ. रोहीत पवार या काका पुतण्याचे सेटिंग विधानसभा निवडणुकीपासून आहे. आ. रोहीत पवार व त्यांचे संपूर्ण कुटुंब विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात मतदानाच्या दिवसापर्यंत तळ ठोकून होते. बारामती येथे कुटुंबाचे मतदान असताना ते मतदानाला गेले नाही. कराड येथे हे दोघे काका पुतणे भेटले असता अजितदादा यांनी बेट्या मी एक सभा घेतली असते तर काय झाले असते असते चल पाया पड काकाच्या असे म्हणून त्यांच्या विधानसभा निवडणुकीचे सेटींग चव्हाट्यावर आले होते. तसेच आ. रोहीत पवार मतदारसंघात कोणतेही बॅनर लावताना मित्रपरिवार असा उल्लेख यापूर्वी अनेकदा झाला आहे. असे बॅनर कार्यकर्ते नेते कधीच लावत नाहीत. त्यामुळे आ. रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांचे मतदारसंघात केलेले स्वागत कालांतराने अजित दादा गटात जाण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच कार्यकर्ते विकासासाठी सत्तेत जाण्याची आवश्यकता आहे असे जाहीर बोलले जाते त्यामुळे आ. रोहीत पवार यांची बॅनरबाजी राजकीयदृष्ट्या काय संकेत देतात याबाबत ज्योतीषाने सांगण्याची गरज नाही.
stay connected