*पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स सेवा वारंवार बंद, गंभीर रुग्णांना जीव गमवण्याची वेळ; आरोग्य प्रशासन झोपेत? गंभीर प्रकरणांची चौकशी करून कारवाई करा - अंगद सांगळे*
पाटोदा *(प्रतिनिधी)* पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा वारंवार बंद राहत असल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या सेवेसाठी कॉल केल्यास ॲम्बुलन्स उपलब्ध नसेल,किंवा गाडी बंद आहे असे सांगण्यात येते. यामुळे गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच एका प्रकरणात रात्रीच्या सुमारास एका गंभीर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागत असताना 108 ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही. नाईलाजाने खाजगी वाहनातून बीडला हलवावे लागले. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडली यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स सेवा 24x7 सुरु ठेवण्यात यावे तसेच वारंवार बंद राहणाऱ्या ॲम्बुलन्स सेवेबाबत उच्चस्तरीय चौकशी करणे
दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे
स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप निश्चित होईल. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसील प्रशासन आणि आरोग्य मंत्रालयाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे नसता मोठी दुर्घटना होऊ शकते यामुळे तात्काळ पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स सेवा वारंवार बंद का असते यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवानेते अंगद सांगळे व पाटोदा तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक करत आहे
stay connected