आनंद चरिटेबल संस्था संचलित पॉलिटेक्निक आष्टी मध्ये नेत्रदान जनजागृती शिबिर
आष्टी ता. २५ : येथील आनंद शैक्षणिक संकुल येथे आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डिप्लोमा इन इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेकनिक) एनएसएस विभाग,छ. शाहू फुले आंबेडकर कृषि महाविद्यालय व महेश आयुर्वेद महाविद्यालय आष्टी मार्फत नेत्रदान जनजागृती शिबिर घेण्यात आले.जनजागृती शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय बोडखे , विभागप्रमुख प्रा.डोने लक्ष्मण ,प्रा.धोंडे संदीप , प्रा.खिळदकर सुनिल, प्रा.पवार योगेश, एनएसएस विभाग श्री चहांदे किशोर,पठाण तय्यब आदी कर्मचारी सहभागी होते. कार्यक्रमाला छ. शाहू फुले आंबेडकर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस आर अरसूल , प्रा.पवार व प्राध्यापिका बनकर सुजाता उपस्थित होते शिबिरास प्रमुख मार्गदर्शक महेश आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी (उपाध्यक्ष द अससोसिएशन ऑफ शालकी मुंबई ) उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे महत्व समजावून सांगितले व मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ.अजय दादा धोंडे , प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत सर प्राचार्य साईनाथ मोहळकर सर , प्राचार्य सुनिल कोल्हे सर यांचे सहकार्य लाभले.
stay connected