पिंपळेश्वराच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर आ.धस यांनी सपत्नीक केला महाभिषेक

पिंपळेश्वराच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर आ.धस यांनी सपत्नीक केला महाभिषेक




आष्टी (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे याही वर्षी आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्री निमित्त भक्तांचा महासागर लोटला.महाशिवरात्रीच्या प्रारंभी आ.सुरेश धस यांनी सपत्नीक महाभिषेक केला.तर पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत सार्वजनिक अभिषेक संपन्न झाले.मात्र 

यावर्षी भाविकांच्या प्रचंड गर्दीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याचे यावेळी दिसून आले.

बुधवारी महाशिवरात्री निमित्त आष्टी शहरातील ग्रामदैवत असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात पहाटे पासूनच भक्तांची रीघ लागली होती.तत्पूर्वी आ.सुरेश धस यांनी प्रारंभी सपत्नीक महाभिषेक केला.या प्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे देखील उपस्थित होते.पहाटे 4 ते 7 यावेळेत भाविक भक्तांनी भक्तांचे अभिषेक संपन्न झाले.सकाळी 7 वाजल्यापासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केली होती.रात्री उशिरापर्यंत या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर सायंकाळी फटाक्याच्या आतषबाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते.आष्टी तालुक्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले.सायंकाळी पारंपरिक गोंधळ गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.तर भाविकांसाठी उपवासाच्या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.आज गुरुवार दि.27 रोजी दुपारी शहरातून पारंपरिक वाद्यासह पिंपळेश्वर महादेवाच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा संपन्न होणार असून या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



शिव पार्वती रांगोळीने लक्ष वेधले.
या वेळी मंदिर परिसरात श्रीमती कोमल थेटे यांनी भगवान शिव- पार्वती रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.तब्बल 5 तास ही रांगोळी काढण्यासाठी लागले. 4 × 6 आकारात ही रांगोळी साकारण्यात आली होती.



मोफत चहाचे वाटप
शहरातील हॉटेल व्यावसायिक असलेले दत्ता राऊत यांनी सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांसाठी मोफत चहाचे वाटप केले होते.त्यामुळे आलेल्या प्रत्येक भाविकांनी याचा लाभ घेतल्याने ही अविरत सेवा कायम ठेवण्याचा संकल्प दत्ता राऊत यांनी बोलून दाखवला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.