*पिसाळलेल्या कुत्र्याचा मुर्शदपुर भागात हैदोस*
---------------
*नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
------------------
आष्टी (प्रतिनिधी) - कालपासून आष्टी शहराच्या मूर्शदपुर भागामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस मांडला आहे. बुधवार (ता.17 ) रोजी सकाळी मुर्शदपुर भागातील मंगरूळ रोड माऊली मंदिर रस्त्यालगत असलेल्या भागात राहत असलेल्या पाटकुळे यांच्या बारा वर्षीय मुलीस या कुत्र्याने चावा घेतला आहे तर करीमनगर भागात अडीच वर्षाच्या लहान चिमुरड्या वर देखील या कुत्र्याने हल्ला केला आहे.या पिसाळलेल्या कुत्र्याने सर्वात प्रथम अडीच वर्षीय बालकावर चावा घेतला. यानंतर याच परिसरातील पाटकुळे यांच्या मुलीवर हल्ला करत चावा घेतल्याने त्यांना मोठी दुखापत झाली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने जबर चावा घेतला असल्याची घटना घडली आहे. तांबड्या रंगाच्या कुत्र्याने 3 लोकांना जबर चावा घेतला आहे.
सध्या या परिसरातील विविध ठिकाणी सदरील पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन बाधित केले आहे. काल रात्री बाधित रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यावर तात्काळ पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुर्शदपुर भागातील लोकांनी अशी मागणी मुर्शदपुर भागातील नागरिकांनी केली आहे या भागात लहान मुले वयोवृद्ध तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाली आहे.
stay connected