आ.आजबे यांनी आषाढी एकादशीनिमित्त कपारीच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन 20 लक्ष रुपयेच्या सभामंडपाचे नांदूर येथे केले भूमिपूजन
आष्टी प्रतिनिधी
नांदूर विठ्ठलाचे हे आष्टी तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात तर वर्षभर या ठिकाणी भक्तांची ये जा असते त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील सुधारणा करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत या ठिकाणी ज्या सुविधा लागतील त्या सुविधा पुरवण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी 20 लक्ष रुपये किमतीच्या सभा मंडपाचे भूमिपूजन करतेवेळी नांदूर येथे सांगितले आषाढी एकादशीनिमित्त आ. बाळासाहेब आजबे काका यांनी नांदूर येथे कपारीचे विठ्ठलाचे दर्शन घेत मंदिर परिसरात २० लक्ष रुपये किमतीच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते .
आषाढी एकादशी निमित्त आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी जाऊन प्रथम कपारीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले त्यानंतर या ठिकाणी भरलेल्या भव्य यात्रेची पाहणी केली व नांदूर ग्रामस्थ विठ्ठल मंदिर कमिटी बरोबर या ठिकाणच्या विकास कामाबाबत चर्चा करून 20 लक्ष रुपये किमतीच्या सभामंडपाचे भूमिपूजन यावेळी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध असे हे देवस्थान असून या देवस्थानचा विकास होणे गरजेचे आहे या अगोदरही आपण या ठिकाणी वेगवेगळे विकासाची कामे मंजूर करून दिली आहेत ते कामे पूर्ण झाले आहेत व आज या ठिकाणी आवश्यक असणारा सभामंडपासाठी वीस लक्ष रुपये वर्क ऑर्डर मी देत असून लवकरच हा सभामंडप नांदूर ग्रामस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करत यापुढे या ठिकाणी लागणाऱ्या विकास कामासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू असा शब्दही नांदूर ग्रामस्थांना यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी दिला या कार्यक्रमासाठी धैर्यशील थोरवे महादेव डोके बाबासाहेब भिटे शामराव फसले सरपंच संजय जाधव नांदूरचे उपसरपंच पप्पू शेठ गवळी ग्रामस्थांसह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
यात्रेची सविस्तर VDO बातमी पहा👇
.
stay connected