डॉ. सुजित उत्तम हजारे यास MBBS पदवी प्रदान

 डॉ. सुजित उत्तम हजारे यास एमबीबीएस पदवी प्रदान




बीड, दि.१६ ( प्रतिनिधी ) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम कचरू हजारे यांचे चिरंजीव डॉ. सुजित उत्तम हजार यांना एमबीबीएस पदवी सोमवारी लातूर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.

     डॉ. सुजित हजारे याने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालतुन एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून, एमबीएसच्या सर्व वर्षाच्या परिक्षेत सुजितने घवघवीत यश मिळविले आहे. इंटरशीप ( अंर्तवास) संपल्यानंतर, सोमवार दि.१५ एप्रिल रोजी लातूर येथे पदवीदान सोहळा संपन्न झाला. डॉ. सुजित हजारे यांचे प्राथमीक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयातून तर महाविद्यालयीन शिक्षण बलभीम महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा एमबीबीएससाठी नंबर लागल्यानंतर, त्याने एमबीबीएस पूर्ण केले. लातूर येथे झालेल्या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते. यापुढे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेऊन रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे डॉ. सुजित उत्तम हजारे यांनी सांगितले. डॉ. सुजितच्या या यशाबद्दल ॲड. विश्वनाथराव मगर, उत्तमराव पवार, नागसेन धन्वे, डॉ. संतोष तुपेरे, लक्ष्मण हजारे, डी. के. जाधव, प्रा. गंगाधर घोडेराव, भारत मगर, रघुनाथ वक्ते, भाऊराव उपदेशे, कचरू घोडेराव, दिलीप जाधव, अजय हजारे, शरद मगर, राहूल हजारे, अविनाश मगर, विकास वक्ते, देविदास हजारे, आनंद हजारे,  महेंद्र घोडेराव, प्रदीप उपदेशे, विशाल वक्ते, राजेंद्र कोरडे, संजय कोरडे, नितीन जावळे , नोबेल हजारे आदींनी अभिनंदन केले आहे. डॉ. सुजित हजारे यांचे सिरसमार्ग ग्रामस्थांसह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.



----------









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.