अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित रहा - समाधान गायकवाड
वाढती महागाई बेरोजगारी आरक्षणासाठी सर्व समाजाला झुलवत ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे तसेच जिल्ह्यातील लोकांच्या हाताला काम नाही शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं नाही शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही इथला शेतकरी कष्टकरी कामगार या सरकारला कंठाळलेला असुन आता नको युती नको मविआ आता फक्त पाहिजे वंचित बहुजन आघाडी असा सुर जिल्ह्यातील मतदारातुन निघताना दिसत आहे
त्यामुळे आता या दोघांनाही बाजुला सारुन वंचित बहुजन आघाडीला मतदारातुन मोठ्या प्रमाणात जनतेचा समर्थन मिळत आहे.याच जोरावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार होणार आहेत,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पायी रॅलीने दि२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुका आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने तालुक्यातुन बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुका महासचिव
मा.समाधान गायकवाड यांनी केले आहे....
stay connected