गोष्ट एका गावाची,निवडणुकीच्या रण -संग्रामाची - डॉ. जितीन वंजारे

 गोष्ट एका गावाची,निवडणुकीच्या रण-संग्रामाची - डॉ. जितीन वंजारे



          एका गांवात एक नेता होता, तो गावातील गोर गरिबांची पोरं,म्हातारे मांनस गुलाम बनवून त्यांना भडकवत असे,एके काळी त्याची गावावर सत्ता आली त्याचा माज वाढला, सोबतच्या लाथाडून एकटा मलिदा खाण्यासाठी पुढे आला,त्याच्यासाठी खस्ता खणाऱ्याला बाजूला सारून त्याच्याच विरोधातल्या लोकांसोबत फुगड्या आणि कुबड्या खेळू लागला ह्या वागण्याला आणि त्याच्या माजाला कंटाळून लोक बाजूला झाली गावात एकही काम होईना आणि ग्राम दैवताची खोटी शपत घेऊन जे करील म्हटला ते केले नसल्याने गावतील जागृत देवस्थान आणि नगद नारायणाचा  कोप झाला,गावात प्रचंड दुष्काळ पडला त्याच्या लांड्या-लबाडीने गाव रसातळाला गेला,विहिरी-बोर रसातळाला गेल्या, पाण्याचा थेंबही भेटेना, माणसात माणूस राहिला नाही, बापात पोरगं राहील नाही,भावात भाव राहिला नाही सगळे दुभंगले चारपाच टकूचे सोडता कोणीच गावात थांबेना,गाव ओस पडल्यागत झालं, लोकांना दुष्काळात होरपळत पाहून ह्यो धार्मिक अत्याचार करू लागला त्यातच देवाच्या नावाने पैसे उकळू लागला पण गावकरी प्रचंड तहानलेले असताना हा काहीही करू शकला नाही,गावात प्रचंड भ्रष्टाचार वाढला, हाहाकार माजला गावात षंड होऊन भक्त बसू लागले,ग्रामपंचायत चालवता येईना,पाण्यासाठी टँकर येईना, नाल्या अस्वच्छ अख्खा गाव अस्वच्छ ,विकास होईना,जाहीरनामा मधे प्रसिद्ध केलेले एकही काम होईना,लोकांच्या कामात बोट घातली होती म्हणून यालाही कोणी काम करू देऊन म्हणजे भ्रष्टाचार करू देईना म्हणून हा पण काम करीना,गावात विकत पाणी पिण्याची वेळ आली रोज बाया शिव्या श्राप देऊ लागल्या,ह्याच्या नावाने रंडकी कुंडली काढली जाऊ लागली,ह्याने पाण्यातही पैसे खाल्ले कारण रक्तातच गद्दारी असल्यामुळे सगळीकडे मंजुरी साठी पैसे खाल्ले गेले,विहीर आणि पंप पंचेविस हजार,विहीर पंधरा हजार,घरकुल दहा हजार, कांदाचाळ किंवा ईतर सरकारी योजना पाच हजार अशी रेट लाऊन वसुली चालू होती अशी कमिशन गोळा करू लागला ,ह्याने गावातील गटारी खाल्ल्या, लाईटी खाल्या,रोजगार हमीची योजना लाटू लागला,गावात दुर्गंधी वाढली  पण गावातील हुशार डॉक्टर इंजिनिअर लोकांमुळे ह्याच काही चालेना आता गावात विकास आणायचां तरी काय ह्या प्रश्नाने त्याच वजन कमी झाल आपलं पाप सगळ्या जगाला कळाल हे त्याला पुरत कळलं लोक जागे झाले,गावातील तरुण जागे झाले त्याच्या प्रत्येक हालचाली वर वाच ठेवला गेला आणि पाहता पाहता सत्ता अधुरी सोडण्याची नामुस्की त्याच्यावर आली,फसवाफसवी जास्त काळ टिकली नाही, स्वतःचे भागिदारीतले दोन नंबर धंदे गावात वाढले लोक व्यसनाधीन झाले गावात भूतो न भविष्य पत्त्याचे क्लब,दारूची अनधिकृत दुकाने , बार,मटका, सट्टा सगळंच चालू झाला ह्या सगळ्या धंद्यांना तो अभय देत असे एव्हाना त्यात कमिशन खात असे किंवा भागीदारी करत असे त्यामुळे कमिशन देऊन चार पाच इतर गावातील लोकांसोबत ह्याने अवैध धंदे , वाळू उपसा,आणि नोकरीला लावतो ,पगार चालू करतो, घरकुल देतो, विहीर देतो,चाल देतो म्हणून लोकांकडून पैसे खाल्ले ,गोर गरीबांचे मुल ह्याला बळी पडले त्यांचे पैसे बुडवले ,आणि हा गडी सगळ्यांची वाट लाऊन एका फाकिराच्या ग्रुप मध्ये सामील झाला एव्हाना तो अगोदरच मनुवादी कुत्र्यात सामील होता,शिक्षणाची होळी करून बिन आईच हेच पिल्लू फकिरागत काही दिवसांसाठी अगोदर आणि आता कायमच गुल झाल जे स्वतःच्या आईच किंवा स्वतःच्या बापाचं झालं नाही ते समाजाचं कधीच होणार नाही हे सांगणारे गावातील सुशिक्षित लोक आम्ही अगोदरच सांगितलं होत म्हणून ओरडू लागले पण वेळ झाली होती गडी तुफान कठळ्यागत घुसला आणि गावातील सगळ्या स्वप्नवत विकासाच्या गाई गाभण करून पसार झाला तो आजही लोक शोधत आहेत की तो आहे तरी कुठ आणि विकासाच्या गप्पा मारल्या तो विकासही आहे कुठे कोणालाच थांगपत्ता लागेना.......! 

         माणसाला माणूस म्हणून कुटुंबातील वैर दूर करून नियतीने  जगणाऱ्या लोकांत याने फूट पाडून भांडणे लावून गाव अशांत केला ह्याच मोठ पाप पोटी घेऊन गोर गरीबांचे दारू ,पत्ते,बार,मटका ,नोकरीसाठी पैसे,योजना साठी पैसे लुटून घर-दार बरबात केली,गावात अशांतता पसरून हा फकड्या कठळ्या गत पळून गेला आता लोक विचारात आहेत की विकासाच्या गाभण गाई ज्या की मुर्दाड झाल्यात त्याच करायचं काय?ह्यात एकच पर्याय लोकांना दिसला आता असल्या कठाळ्याला पुन्हा सत्तेवर बसवायचं नाही,एखादा सुशिक्षित निरपेक्ष ,माणुसकी जपणारा,नियतीने वागणारा,सांसारिक,पारिवारिक डॉक्टर-इंजिनिअर किंवा कौटुंबिक व्यक्ती सत्तेत द्यायचा आणि आपल्या गावाची प्रगती करायची.लोक कुणाच्यातरी सत्ताधारीच्या  दावणीला नेऊन बांधनारा, युद्ध पेटल्यावर छोला लेकें भाग जाणे वाला किंवा आश्वासन देऊन निव्वळ बेईमान होणारा मतलबी, ग्राम दैवताची खोटी शपत खाणारा कठळ्या नक्कीच नको इतकी अक्कल लोकांना आली होती .....!

        गावातील सुजाण नागरिकांना हे समजताच याला पायउतार केलं गेलं एव्हाना हाच पळून गेला कमिशन वृत्ती ठेवून खाऊन खाऊन गडी फुगला माणसं ओळखून पारखून जपायच सोडून तो तोडू लागला अस करून करून एकटं पडल्याने पळून गेला गाव जाग्यावर आहे राहिलेल्या चांगल्या लोकांना घेऊन गावाची पुन्हा मोट बांधन चालू आहे.ह्या गोष्टीतून एकच संदेश द्यायचा आहे आता लोकशाहीचा उत्सव निवडणूक येत आहेत त्यात योग्य चांगला आणि आपल्यासाठी,मातीसाठी ईमान राखून काम करणारा माणूस शोधा ,कोणाच्या एक दोन रुपयांसाठी गुलामी करू नका ,लोकसभेसाठी मतदान करताना आपल्याला समाजाला शिक्षण,रोजगार,महागाई, बाजारीकरण, घसरलेला जीडीपी, जातीयवाद,प्रांतवाद,पाणी,आरोग्य, परराष्ट्र धोरण, आयात निर्यात, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण,इत्यादीसाठी भक्कम काम करणारा माणूस शोधा त्यालाच निवडा.कोणीही फाकिराला लकीर देऊ नका नाहीतर कठळ्या तयार होऊन पळून जाईल बरका ........!!!

*लेखन सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर-९९२२५४१०३०*





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.