AKOLA | महाराष्ट्रात महाशक्तीने काय केलं हे जनतेसमोर मांडा तरच लोक डोक्यावर घेतील, नाहीतर तुमचा विषय संपला : NANA PATOLE
अकोला (प्रतिनिधी ) - केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्ती घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून घेईल', असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान असून पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा हवाला देताना हे सांगितले. यावर नाना पटोले प्रत्युत्तर देत म्हणाले की, मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते, अर्थतज्ञ होते. आर्थिक परिस्थिती कशी बदलवली आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवस्था निर्माण केल्या, त्याची तुलना नरेंद्र मोदींसोबत होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी हे देशाची संपत्ती विकून देश चालवतात. तर देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम केलं आहे. तर आपण जे अदानी आणि अंबानीसह मित्रांची घर भरलेली आहेत, त्यांचा पैसा कढून जनतेत वाटू असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्या प्रचार दौऱ्यासाठी अकोला जिल्ह्यात आले आहेत.
शिंदे तुम्ही कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहीत आहे. ज्या उद्देशाने मुख्यमंत्री झाले त्या उद्दिष्टाची सफलता कुठे महाराष्ट्रात झाली. तर निवडणुकीच्या तोंडावर ज्या साड्या तुम्ही घेऊन दिला त्यात झालेला भ्रष्टाचार, याकडे सर्वात आधी लक्ष द्या, राज्यात पिण्याचं पाणी नाही त्याकडे लक्ष द्या, हे जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले पाहिजेत. महाराष्ट्रात महाशक्तीने काय केलं हे जनतेसमोर मांडा तरच तुम्हाला लोक डोक्यावर घेतील, नाहीतर तुमचा विषय संपला असं समजा, असा खोचक टोला यावेळी नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
stay connected