संविधान दिन चिरायु होवो : का गोष्टी करतो संविधान बदलविण्याच्या

 संविधान दिन चिरायु होवो

Sanvidhan din


        संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं यात काहीच शंका नाही.त्यानुसार आम्ही नितीनियमानं चालायला लागलो.संविधानाचे पाईक बनलो.आजही संविधान आम्ही प्रत्येक शाळेत वाचतो आहोत.त्याची एक आठवण म्हणुन.पण....

        अलिकडच्या काळात आम्ही संविधानाला घाबरतो का?असा जर प्रश्न आम्ही आमच्या मनाला केल्यास त्याचे उत्तर नाही असेच येते.आम्ही आजही संविधानाला घाबरत नाही.याचं कारणही तसंच आहे.

      कायदे आहेत,पण त्याची ठोस अंमलबजावणी आम्हाला आजच्या काळात दिसुन येत नाही.साधी चार वर्षाची मुलगी आज शारीरिक बलात्काराची शिकार ठरत आहे.कधी शेजारचा मुलगा,कधी काका तर कधी सख्खाच बाप आपल्या सख्ख्या मुलीवर बलत्कार करुन मोकळा होतो.दिल्लीची निर्भया,काश्मीरची आसीफा नव्हे तर कोपर्डीची तरुणी  ह्या तर वयानं मोठ्या होत्या.निर्भया बलत्कार कांड झाल्यानंतरही समाज सुधारला का नाही.त्यानंतर आसीफा झालंच.बलत्काराला शिक्षेचं प्रावधान असुनही......निर्भया पुर्वीही अरुणा शानबाग ही या शारीरिक अत्याचाराची बळी ठरलीच होती आणि तिचा अत्याचारी दिल्लीत शिक्षा पुर्ण करुनही मजेत दुस-या पत्नीसोबत मजेत होता.

      आज आमच्या देशात शिक्षेला काहीच महत्व नाही.गुन्हेगार शिक्षा भोगत असतांना तो आजारी पडलाच तर तो पळुन जाऊ नये म्हणुन त्याच्या मागे पुढे पोलिस अधिकारी असतात.जसा तो कोणी व्ही आय पी लागला.त्याला दवाखान्यात सामान्यांपरस जास्त जेवणंही मिळतं.अर्थात सामान्यांना दोन पोळ्या,थोडासा भात व भाजी.याला चार पोळ्या आणि अजुन देवु का असा आग्रह.किती लाड अन् किती आवभगत.आमचं संविधान मोडलं म्हणुन की काय?

        आमच्या या देशात आमचा शेतकरी आत्महत्या करतोय.एका काळात कापुस आणि सोना एका भावात होते.पांढरा सोना व पिवळा सोना असे म्हणत असत.एवढं सोनं होतं.शेत्या पैसा चालत नसल्यानं सोने मोडुन विनिमय केली जात असे.आज सोन्याचा भाव आहे.कापुस जागच्या जागी.का शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय?तरीही आम्ही स्वतःला सक्षम समजतो.

       डाँ.बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अहोरात्र मेहनत करुन संविधान लिहिलं.दोन वर्ष अकरा महिने सव्वीस दिवस.त्यासाठी दिवसरात्र राबले ते अन् ते पुढे सव्वीस जानेवारी १९५० ला लागु झालं.बाबासाहेबांनी संविधान लिहिलं.कशासाठी?तर देशाचा राजकिय,सामाजिक अार्थीक,शैक्षणिक कारभार व्यवस्थित चालावा.कोणीही भ्रष्टाचार करु नये.शिष्टाचार निर्माण व्हावा.पण झालं उलटंच.शिष्टाचार निर्माण होण्याऐवजी भ्रष्टाचार निर्माण झाला.गुन्हेगारी निर्माण झाली.ती वाढत आहे.भ्रष्टाचार ही वाढत आहे.अन् आम्ही त्याला खतपाणी देत वाढवत चाललेले आहो.निव्वळ २६ नोव्हेंबर आलं की व्यासपीठावर दोनचार लोकं बोलावुन संविधान दिवस साजरा करतो.रँली काढतो.पण तो दिवस गेला रे गेला की मग गुन्हे करायला मोकळे.याच दिवशी फक्त संविधान दिन चिरायु होवो म्हणतो.बाकी दिवस मात्र संविधानानुसार चालण्या वागण्याची आठवणही येत नाही.देशाला भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणतो आणि दुसरीकडे अरुणा,आसीफा,निर्भयावर बलत्कार तर करतोच करतो.त्यांचा खुनही करतो.खरंच बाबासाहेबांनी याचसाठी संविधान निर्माण केलं का?त्याचं उत्तर आम्हाला आजही देता येत नाही.आजही दलितांवर अत्याचार सुरुच आहे.स्रियांवरही अत्याचार सुरुच आहेत. 

        आमच्या देशात संविधान जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी बरोबर होत नसल्याने आम्हाला संविधानाचा धाक राहिलेला नाही.कारखान्यात आजही कामगारांना उभ्या भट्टीत फेकलं जातं.आजही नववधु हमखास जाळली जाते.आजही दारु पिवुन स्व पत्नीला मारले जाते.दररोज पेपरमध्ये खुन,बलत्कार,दलित अत्याचाराच्या बातम्या.....हद झाली.

        आज संविधान दिवस जरी असला तरी या दिवशी भाषण देणारी नेतेमंडळी कितपत चारित्र्यवान असतात ते न विचारलेलं बरं.तरीही ते व्यासपीठावर अस्सं भाषण ठोकतील की त्यांच्यासारखा चारित्र्यवान जगात नाही.

        मित्रांनो,बाबासाहेबांनी अथक परिश्रम करुन संविधान लिहिलं.खुप कस लागला.त्यांनी संविधान लिहितांना रात्र रात्र झोप घेतली नाही.संविधान केवळ परिदृश्य जातीसाठीच लिहिलं नाही तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी लिहिलं.केवळ बाबासाहेबांनी लिहिलं म्हणुन उपहास करु नका.निव्वळ आज संविधान दिवस आहे.म्हणुन संविधान दिवसाला आजच्या पुरतं मर्यादित ठेवु नका.संविधान आपलं आहे.आपल्यासाठी आहे.त्याला आपलं माना आणि जीवनाची नव्याने सुरुवात करा.उद्यापासुन पेपरला खुन,बलत्कार,हत्या ह्या गोष्टी दिसायलाच नको याची शपथ घ्या आणि पुन्हा एकदा म्हणा......भारत माता की जय.संविधान दिन चिरायु होवो.

         अंकुश शिंगाडे नागपुर 9373359450

©®©



*का गोष्टी करतो संविधान बदलविण्याच्या*


        सहा डिसेंबर.डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस.ज्या बाबांनी दलितांनाच नाही तर संबंध मानवजातीला एक संदेश दिला.त्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन.आज बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास पूर्ण जगात केल्या जात आहे.देशाचे धोरण ठरविण्यासाठी त्यांच्या विचारांची मदत होत आहे.

       बाबासाहेबांबद्दल सांगायचं झाल्यास बाबासाहेब सहजासहजी घडले नाहीत.त्यांना असंख्य वेदनेतुन वाट काढत पुढं जावं लागलं.त्यासाठी आंदोलनही करावं लागलं.मार खाण्याची ही वेळ आली होतीच.पण विद्वान ते बचावले.त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मार खावु दिला नाही.

        चवदार तळ्याच्या आंदोलनादरम्यान बाबासाहेबांना मारण्यासाठी लाठ्या घेवुन आलेल्या लोकांना बाबासाहेबांनी चक्क सांगितलं की याद राखा.तुम्ही जर का माझ्या केसालाही धक्का लावण्याचा साधा विचार जरी केला,तरी तो महागात पडेल.मग मारणारे मारेकरी माघारी फिरले.कारण त्यांना १८१८ चा थरार माहीचच होता.पेशव्यांना पाचशे महारांनी सरळ कापुनच टाकले होते.

        चवदार तळ्याच्या वेळी महाडात तर सभा भरली.त्याचवेळी अध्यक्ष असलेल्या बापुसाहेब सहस्रबुद्धेच्या नेतृत्वात स्री व दलित वर्गाचे हनन करीत असलेल्या मनुस्मृतीला जाळण्यात आलं.तेही भर सभेत वाचन करुन.पण कोणीही का जाळता म्हणायला,वा विरोध करायला आला नाही.कारण मनुस्मृती वाईटच होती.

      कोणी जर प्रश्न केला की बाबासाहेबांना चवदार तळ्याच्या आंदोलनाची गरज का भासली?तर त्याला मुर्खात काढावे लागेल.चवदार तळ्याच्या आंदोलनापुर्वी महाडात महारांसाठी एक विहीर होती.ही विहीर जमीनीला समथल असल्यानं कोणताही प्राणी केव्हा पडेल हे सांगता येत नव्हते.त्यातच या विहीरीत एकदा डुकरं पडली होती.पण तरीही तळ्याचं पाणी कोणीही पिवु दिलं नाही.म्हणुन तोच राग असल्यानं लोक बाबासाहेबांचे पाठीमागं उभी राहिली व त्यांना मदत केली.कदाचित बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं आंदोलन केलं नसतं,तर आज आमचा दलित बांधव तशाच प्रकारच्या वेदना सहन करीत राहीला असता.चवदार तळ्याच्या आंदोलनाने बाबासाहेबांंच्या विचाराला चालना आणि दिशा दिली.अतिशय शांततामय मार्गाने बाबासाहेबांनी हे पाणी अस्पृश्यांना वापरण्यासाठी मोकळं करुन दिलं.त्यानंतर इतरही ठिकाणी असेच उठाव झाले.हळूहळू भेदभाव कमी होवु लागला.

          १९२७ च्या या चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर बाबासाहेबांनी मागे वळून पाहिलच नाही.या आंदोलनानंतर ती केस कोर्टात गेली.१९३५ पर्यंत चालली.ती केस स्वतः बाबासाहेब लढले.त्यावेळी बराच त्रास झाला.बाबासाहेबांजवळ पैसेही नसायचे तारखेवर जायला.याच काळात राजरत्न तर याच काळात रमाईही आजारानं गेल्या.खुप अतोनात नुकसान झालं.कधी उपाशी राहुन बाबासाहेबांनी ही केस लढली.त्यांनी घरादाराकडे लक्ष दिलं नाही.स्वतः याच काळात टिळकांच्या केसरीतुन बाबासाहेबावर ताशेरे घेणारे लेख छापल्या गेले.पण बाबासाहेब डगमगले नाही.त्यांनी सनातनी बांधवांना आपल्या बहिष्कृत भारत आणि मुकनायक मधुन सडेतोड उत्तरे दिली. अखेर ते केस जिंकलेच.दलितांचा विजय झाला.नंतर बाबासाहेबांनी संविधान ही लिहिले.त्यात भेदभाव पुर्णपणे दूर करण्यासाठी कलमा टाकण्यात आल्या.जेणेकरुन दलित हक्काचे हनन झाल्यास न्यायालयातुन न्याय मागता येईल.एवढेच नाही तर न्यायालयातुन बाकी समाजालाही न्याय मागता यावा याचाही विचार बाबासाहेबांनी केला.त्यानुसार घटनेत तशी तरतुद करुन ठेवलेली आहे.

        बाबासाहेबांनी खरं तर संपुर्ण समाजातील लोकांसाठी कार्य केले.पण आज मात्र बाबासाहेबांना आम्ही फक्त दलित जातीपुरतंच मर्यादीत ठेवलं आहे.का बाकीच्यांना त्याचा फायदा नाही काय?संविधान कमेटी असुनही बाबासाहेबांना लिहायला बाध्य करणारं संविधान,बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान संविधान आज आम्ही बदलविण्याची भाषा करतोय.यातील एका एका कलमावर जेव्हा संसदेत चर्चा होत असे.अन् जेव्हा बाबासाहेब प्रश्न विचारीत.तेव्हा बाकीच्यांची बोलती बंद होत असे.नव्हे तर बाबासाहेबांना कोणी प्रश्न विचारल्यास बाबासाहेब ताडकन त्याचं उत्तर देत.एवढा त्यांचा अभ्यास दांडगा होता.डाँ राजेंद्र प्रसाद ह्यांनी त्यांची याच व्याख्यानानंतर पाठ थोपटली होती. 

         त्यांच्यासारखा कधी जगात विद्वान होणेच नाही.बाबासाहेबांनी हे कार्य करीत असतांना घरादाराकडे पाहिलच नाही.ते सतत आजारी असायचे.त्यातच नर्स असलल्या सविता माई सांभाळायच्या.त्यांना वेळोवेळी औषधी द्यायच्या.परजातीच्या असुनही.बाबासाहेबांची काळजी घ्यायच्या.

       बाबासाहेबांना बीपी लो चा त्रास होता.१९४८ लाच त्यांची प्रकृती बिघडली होती.पण माईच्या कृपेने म्हणा की सेवेने ते वाचले व संविधान लिहिते झाले.खरं तर रमा आणि संविता बाबासाहेब नावाच्या नाण्याच्या दोन बाजु होत्या.दोघीनंही भेदभाव दूर करण्यासाठी बाबांना सहकार्य केलं.एकीनं चवदार तळ्याच्या आंदोलनात प्रकृती खराब असुनही बाबासाहेबांनी तिच्या प्रकृतीकडे लक्ष देवु नये.म्हणुन माझी प्रकृती खराब आहे हे दाखवलं नाही.नव्हे तर बाबासाहेब विदेशात शिकायला गेले.तरी तिनं जावु दिलं.शिकायत केली नाही.प्रसंगी गोव-या थापल्या.त्या विकुन संसार चालवला.बाबासाहेबांना घडवलं.तर बरेच वर्ष अविवाहीत असलेले बाबासाहेब विवाह करीत नसतांनाही ते जगले पाहिजे म्हणुन तळमळणारी सविता त्यांच्यासोबत राहायची..सेवा करायची.आजची मुलगी वारंवार प्रकृती खराब होते.काय हे दुखणं असा विचार करीत तिनं बाबासाहेबांशी विवाह केला नसता.पण सविताला हे माहीत असुनही तिनं बाबासाहेबांशी लग्न केलं.त्यांना जपलं.सांभाळलं.म्हणुन संविधान घडलं.माई रमाईने भेदभाव दूर करण्याची मुहूर्तमेढ रोवली तर माई सवितानं तो बेत लयास नेला.अर्थात भेदभाव पुर्णपणे समाप्त करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहावं यासाठी त्यांना सर्व प्रकारचं बळ पुरवलं.

         आज बाबासाहेब हयात नाहीत सविताही नाही अन् रमाही नाही.फक्त त्यांचे विचार हयात आहेत.त्यांनी केलेले कार्य हयात आहेत.आम्ही संविधान बदलविण्याची भाषा करतो.बाबासाहेबांसारखा एकतरी मुद्दा संसदेत मांडला का,त्यावर चर्चा घडवुन आणली का?एखाद्या मुद्द्यावर कोणी राजनेत्याने संसदेतील व्यक्तींची बोलती बंद केलीय का?बाबासाहेबांसारखी तळमळ इतर संविधान बदलविण्याची भाषा करणा-या राजनेत्यांना आहे का?अहो ज्या देशाचा पोशिंदा आत्महत्या करतोय.ज्या देशात हुंडा बंदी असुनही राजरोषपणे हुंड्यासाठी महिलांचा खुन होतो.जाळपोळ होते.नव्हे तर राजरोषपणे याच देशात महिलांवर दिनदहाडे बलत्कार होतात.त्याच्यावरचा अत्याचार दूर करण्याची आमच्यात नाही.घटनेत तरतुद तशी असुनही.मग काय संविधान बदलवुन तिर मारणार आहो आपण.जे आहे त्यालाच नीट सांभाळता येत नाही.अन् संविधान बदलतो म्हणतो आपण.



       आजही दलित जातीवर अत्याचार सुरुच आहेत.भेदभाव पुर्णपणे गेलेला नाही.खैरलांजीला न्यायच नाही.न्यायालयातल्या कितीतरी दलित अत्याचारी प्रकरणात न्यायच नाही.सर्रास खारीज होतात खटले.नव्हे तर उलटा चोर कोतवाल को दाटे या वृत्तीअंतर्गत ह्याच खारीज झालेल्या खटल्यांना खोटे ठरवत दलितांना त्रास देण्यासाठी नव्हे तर बदला काढण्यासाठी आम्ही न्यायालयात परत तेच खटले पुन्हा रिपीट करुन न्यायालयाचा वेळ तर बर्बाद करतोच.शिवाय न्यायालयाची दिशाभुलही करतो.

        संविधान का यासाठी बनवलं का?नोटबंदी जेव्हा झाली.दररोज वेगवेगळे निर्णय.ना संसदेत चर्चा ना काही.महाराष्ट्रात तरी शिक्षणाची ऐसीतैसी.दररोज सकाळी जी आर निघतो.चांगला न वाटल्यास सायंकाळी रद्द होतो अर्थात कच-याच्या डब्यात.कसे लोकं बसवलेत कायदे(जी आर)बनविणारे.वेळोवेळी बदलवावे लागतात.फाडावे लागतात.काय खाक संविधान लिहिणार!

        खरंच बाबासाहेब विद्वानच होते.त्यांनी लिहिलेला एक एक शब्द त्या संसदेतच नाही,पण आजही तेवढाच जोरकस वाटतो.आपण मात्र त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

          अंकुश शिंगाडे नागपुर ९३७३३५९४५०








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.