Maratha Reservation : सरोटा अंतरवली येथील मराठा आंदोलकावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ केज तालुका बंद.

 Maratha Reservation : सरोटा अंतरवली येथील मराठा आंदोलकावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ केज तालुका बंद.



केज  (प्रतिनिधी)

      सरोटा आंतरवली (जि.जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे जमलेल्या महिला व पुरुषांना अमानुषपणे पोलीस प्रशासनाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ केज तालुका पूर्णपणे स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आला होता.

     अंबड (जि.जालना) तालुक्यातील सरोटा अंतरवाली येथे येथील मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा महिला, पुरुष तसेच लहान , थोर मंडळी येथे येतात.  सरकारच्या सूडबुद्धीने पोलीस प्रशासनाला हे आंदोलन मोडीत काढण्याचे आदेश दिले आणि येथील जमलेल्या महिला तसेच समाज बांधवांवर काठ्यांच्या , अश्रूधुरांचा तसेच काढतुसांच्या साह्याने अमाणूस हल्ला करत त्यांना जखमी करण्याचे षडयंत्र सरकारने यशस्वी केले याच निषेधार्थ म्हणून ठीक ठिकाणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले असून यामध्ये बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून यातच केज तालुक्यातही मोठ्या प्रमाणात बंदला प्रतिसाद मिळाला असून येथे शेकडो मराठा तसेच इतर समाजातील बांधवांनी या मोर्चा उपस्थिती लावली होती. हा मोर्चा केज पंचायत समितीच्या आवारामधून मंगळवार पेठ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि सोनार गल्ली , बस स्टँड येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आंदोलकांच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले. 

    यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत केज शहर दणाणून गेले होते यावेळी जमलेल्या सर्व समाज बांधवांचे ही आभार मानण्यात आले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.