उल्हासनगर मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
उल्हासनगर दि :- उल्हासनगर येथिल अशोका फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन त्यांना ट्राफी सह सन्मानपत्र आणि प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
उल्हासनगर येथिल अशोका फाऊंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या दोन दशका पासुन सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.या संस्थे कडुन दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्याना सत्कार करुन त्यांना शैक्षणिक कार्यात हात भार लावत असते.तेव्हा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दहावी बारावी व पदवी उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन येथिल सम्राट अशोक नगर मध्ये असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालया च्या प्रांगणात करण्यात आले.
या गुणगौरव सोहळ्याला माजी नगरसेवक व आर पी आय चे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सोनवणे, माजी नगरसेविका सविता तोरणे- रगडे,माजी नगरसेविका रेखा ठाकुर , माजी नगरसेविका सुमनताई शेळके , बुध्द विहार विकास समितीचे अध्यक्ष देविदास त्रिभुवन , राष्ट्रवादीचे नेते जमीलभाई खान ,माजी नगरसेवक गजानन शेळके,कॉंग्रेस मागासवर्गिय सेल चे प्रदेश अध्यक्ष राधाचरण करोतिया , मोनु सिद्दीकी ,माजी आयकर अधिकारी सोमकुवर जी , शालिनी गायकवाड आणि अशोका फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी रगडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्राफी सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
या गुणगौरव सोहळ्यात प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात आली . सदर कार्यक्रमात दशरथ चौधरी, आदिनाथ पालवे, तानाजी माळी, साठे सर, समाधान प्रधान, अखिलेश गुप्ता, उगले साहेब, जावळे साहेब , देसले साहेब, पांडे साहेब, मुंजा मुळे, संतोष मिसाळ , मुदलीयार दीदी , शालिनीताई गायकवाड , दिपाली वाघ, रेणुका गायकवाड, हे देखिल ऊपस्थित होते.
यावेळी काही मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या . तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा . विकास ढोके यांनी केले असुन आभार प्रदर्शन अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रमोद घनबहादुर यांनी केले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल रौराळे , रुपेश ढोके , प्रविण घनबहादुर , राज वाघ यांनी चांगले प्रयत्न केले .
stay connected