Ajit Pawar : सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू

Ajit Pawar : सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू 


मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले वर्षभर न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगातील संघर्ष सुरू आहे. असे असतानाच राज्याच्या सत्तानाट्याचा पुढील प्रवेश रविवारी सादर झाला. गेल्या काही महिन्यांपासून नाराजीची चर्चा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दुपारी अडीच वाजता अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्याबरोबर इतर आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने पक्षातील मतभेद उघड झाले असून रात्री उशिरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात पाऊल उचलले असल्याने त्यांची कृती बेकायदेशीर आहे. 

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं,' असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

शरद पवार आणि जयंत पाटलांकडून अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात कठोर पाऊल उचलण्यात आल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ajit Pawar सोबत कोणी-कोणी शपथ घेतली?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील अशा राष्ट्रवादीच्या अन्य आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.-

------------------------------------------ 

 *राष्ट्रवादीत उभी फूट*

------------------------------------------------ 

🔳 *अजित पवारांसोबत असलेले आमदार* 

------------------------------------------------ 

1. छगन भुजबळ  

2. दिलीप वळसे पाटील  

3. हसन मुश्रीफ  

4. धनंजय मुंडे  

5. आदिती तटकरे  

6. संजय बनसोडे  

7. अनिल पाटील  

8.धर्मरावबाबा आत्राम 

9.किरण लहमाटे

10. निलेश लंके

11. दौलत दरोडा

12. मकरंद पाटील

13. अतुल बेनके

14. सुनिल टिंगरे

15. इंद्रनील नाईक

16. अशोक पवार

17. अण्णा बनसोडे

18. सरोज अहिरे

29. बबनदादा शिंदे

20. यशवंत माने

21. नरहरी झिरवळ

22. दत्ता भरणे

23. शेखर निकम

24. दीपक चव्हाण

25. राजेंद्र कारेमोरे

26. नितीन पवार

27. मनोहर चंद्रिकापुरे

28. संग्राम जगताप

29. राजेश पाटील

30. सुनील शेळके

31. दिलीप मोहिते


------------------------------------------------ 

⭕विधानपरिषदेचे आमदार कोणते ?


1. रामराजे निंबाळकर

2. अमोल मिटकरी

3. शशिकांत शिंदे

------------------------------------------------ 

🔳 *अजित पवारांसोबत खासदार कोणते ?* 


1. सुनिल तटकरे

2. अमोल कोल्हे 

3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

------------------------------------------------ 

🔳 *शरद पवारांसोबत कोणते आमदार ?* 


1. जयंत पाटील

2. जितेंद्र आव्हाड

3. रोहित पवार

4.राजेश टोपे

5.प्राजक्त तनपुरे

6.अनिल देशमुख

7. सुनिल भुसारा

8. सुमनताई पाटील

09. संदीप क्षीरसागर

10. बाळासाहेब पाटील

11. चेतन तुपे

12. मानसिंगराव नाईक

------------------------------------------------ 

🔳 *पवारांसोबत खासदार कोणते ?* 


1.सुप्रिया सुळे

2. श्रीनिवास पाटील

3. वंदना चव्हाण (राज्यसभा)

4. फौजिया खान (राज्यसभा)

------------------------------------------------ 

🔳 *यांची भूमिका अद्याप अस्पष्ट -* 


नवाब मलिक

प्रकाश सोळंखे

बाळासाहेब आजबे

आशुतोष काळे

दिलीप बनकर

माणिकराव कोकाटे

चंद्रकांत नवघरे

राजेंद्र शिंगणे

 (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.