आ.सुरेश धस यांची विधानपरिषद विशेषाधिकार समिती सदस्यपदी नियुक्ती...
*******************************
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
धाराशिव (उस्मानाबाद) तथा लातूर,बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ धाराशिव (उस्मानाबाद) मतदार संघाचे आमदार,माजी राज्यमंत्री आ.सुरेश धस यांची महाराष्ट्र विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..
११ सदस्यांची नामनियुक्ती विधानपरिषदचे उपसभापती यांचेकडून १७ मार्च रोजी विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर ११ सदस्यांची नियुक्ती .. सन २०२३-२४ या वर्षासाठी करण्यात आली आहे.. त्यामध्ये धाराशिव तथा लातूर,बीड मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे...
विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर ..या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य आ.प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य आ.प्रवीण पोटे पाटील, आ.सुरेश धस, आ.गोपीचंद पडळकर, ॲड.अनिल परब, आ.विलास पोतनीस, आ.अब्दुल्लाह खान दुर्राणी, आ.शशिकांत शिंदे,आ.भाई जगताप, आ.अभिजित वंजारी,आ.कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रसिद्धी पत्रकाद्वारे यांनी कळविले आहे.
stay connected