कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल

 कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल 

आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामध्ये विविध मतदारसंघातून एकूण ५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण शिंदे यांनी दिली. हमाल मापाडी मतदारसंघातून आमदार सुरेश धस समर्थक राजू हुलगे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.


बीड जिल्ह्यातील कांदा मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि भुसार धान्य यादृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कडाची निवडणूक जाहीर झाली आहे . ही बाजार समिती गेल्या २५ ते ३० वर्षांपासून आमदार सुरेश धस

यांच्या ताब्यात असून त्यांनी बाजार समितीचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे . कडा येथील कांदा परदेशात मलेशिया थायलंड दुबई आदि देशांमध्ये गेल्यामुळे कड्याची पत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकूण संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४ व्यापारी व आडते मतदारसंघातून २ आणि हमाल मापाडी मतदारसंघातून एक याप्रमाणे १८ संचालक निवडले जाणार आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण

५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटी जागा ११ अर्ज ४० ग्रामपंचायत जागा ४ अर्ज १४. व्यापारी व आडत जागा २ अर्ज ३, हमाल मापाडी जागा १ अर्ज १ दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने रमजान तांबोळी, संजय ढोबळे, छाया लगड, अशोक पवार , मधुकर सांयबर, राम मधुरकर, संजय मेहेर, राजू हुलगे, फसले मुरलीधर, पांडुरंग गावडे, शरद देसाई, दिलीप काळे, आदींचा समावेश आहे. दि.६ ते २० एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.