*मंगेश साबळे सारखा सरपंच आपल्याकडे पण होईल का ?*
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैगा या गावाचे सरपंच सन्माननीय मंगेश साबळे यांचा काही दिवसापूर्वी पैसे उधाळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
सरपंच महोदयांनी विहिरी मंजुरीसाठी बारा टक्केनी पैसे मागितलेल्या मॅडमच्या विरोधात 'पैसेफेको' आंदोलन केले. मित्रांनो भारत देश हा भ्रष्टाचाराच्या इतक्या विळख्यात सापडला आहे की एका सरपंचाला अक्षरशः भीक मागून पैसे आणून विहिरी मंजूर करण्यासाठी किंवा इतर शासकीय योजना मंजूर करण्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात.पेन्शन मागणाऱ्या तमाम शासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा व्हिडिओ जर खरा असेल तर नेमकी पेन्शन यांना कशासाठी द्यायची असा नम्र सवाल उत्पन्न होतो. गलेलठ्ठ पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशी गोरगरीब जनतेकडून अडवणूक केली तर सरकार कितीही चांगले असले तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकरी सुखी होणार नाही त्यामुळे याविरोधात मंगेश साबळे सारखे सर्वच नवतरुण उभे झाले पाहिजेत आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे असे मत शेतकरी नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
शासनाची कुठलीही योजना आली तरी ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचताना त्यातील अर्धा लाभही शेतकऱ्याला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे व त्यांच्या ठरलेल्या कमिशनमुळे अशा पद्धतीची आलेल्या लाभाची जिरवा जिरवी सर्रासपणे होत आहे परंतु या विरोधात कोणीही कसलेही प्रकारचा आवाज उठवत नाही परंतु गेवराई पेगा येथील सरपंच मंगेश साबळे या तरुणाने महाराष्ट्राला आगळा वेगळा पायंडा पाडून भ्रष्ट अधिकाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे .अधिकाऱ्यांनी पैसे मागितले की नाही हे जरी माहीत नसले तरी टक्केवारीचा घोळ मात्र संबंध भारतातच चालू आहे पण हा कधीही ओपन होत नाही, 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणी प्रमाणे पैसे देऊन लाभ घेणे हेच सर्रासपणे चालू आहे .त्यामुळे लोकांची प्रामाणिकपने काम करणाऱ्या लोकप्रतीनिधींची पुरती तारांबळ होत आहे .कारण आजकाल बाविसाच्या शतकात बऱ्याच गावात टोपी आणि धोतरावाले वयोवृद्ध पुढारी मागे टाकून जीन्स वाले नवतरुण सरपंच,सदस्य झालेत जे चांगले काम करतील,भ्रष्टचार करणार नाहीत, गावातील घाण,कचरा बजेट, संडास,घरकुल, नाली ,रस्ते,विहिरी, तळे,पाणंद रस्ते,हापसे,बोर,सभागृह,अंगणवाड्या,शैक्षणिक बजेट,शाळा, वित्त आयोग,मागासवर्गीय निधी,खाणार नाहीत त्यात भ्रष्टाचार करणार नाहीत आणि गावात सुधारणा करतील याच धर्तीवर त्यांना निवडून दिले आहे पण सवयीप्रमाणे भ्रष्ट अधिकारी त्यांना तीच टक्केवारीची भाषा करत असतील तर गावात विकास नाही भाकासच होईल हे मात्र नक्की.पण प्रत्येक गावागावात आसा मंगेश साबळे तयार झाला पाहिजे जो अश्या टक्केवारी विरोधात गांधीगिरी करेल आणि मोठ जन-आंदोलन उभारून सामान्य जनतेला न्याय देईल. त्यांच्या हक्कासाठी लढेल. नसता लोकांकडून हातापाया पडून निवडून यायचं आणि काळी, पांढरी स्कॉर्पिओ घेऊन सरपंच नाव टाकायचं आणि मोकाट जनावरा प्रमाणे मीच मोठा म्हणत चार पाच टकूचे घेऊन ढाबा, दारू,पत्ते पिसून पाच वर्ष मजा मारायची आणि परत निवडणूक आली की आडनावाची लाज,गल्लीची लाज, जातीचा माज दाखवून लोकांना प्रलोभने देऊन चुतीया घुमवून परत सत्तेत यायचं हे आता सोडलं पाहिजे . नवतरुनानी निपक्षाती गावचा कारभार हाकला पाहिजे .विशिष्ट विचारसरणी ,मनुवादी ,भोगवादी,अत्याचारी विचारसरणी सोडून सार्वर्भौमवादी,समतेचा,एकतेचा,अखंडतेचा,बंधुभाव ठेवून न्यायवादी संविधान आमलात आणून गाव कारभार चालवणारे ब्राड मायींडेड लोकांच्या हातात कारभार दिला पाहिजे किंवा त्यांनी तसा गावगाडा हाकला पाहिजे . पाटीलकीची नशा बाजूला ठेवून गोरगरीब, पिछाडीवर असणाऱ्या, मगास्वर्गियाना विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे .भ्रष्टाचार कायमचा दूर करून घरकुल योजना,सिंचन,विहिरी, रोजगारनिर्मिती योजना,उद्योग,फलोत्पादन योजना, वृक्ष लागवड,शेतकरी पशुधन योजना,शेतकरी अवजारे योजना,पीक विमा,निराधार योजना,शेतकरी प्रोत्साहन योजना बारकाईने भ्रष्टाचारमुक्त करून राबवल्या पाहिजेत.आणि त्यासाठी मंगेश साबळे सारख्या खमक्या खंबीर सरपंचाची गरज आहे .नसता जाहीरनामा दिलेल्या एकही आश्वासनाची पूर्तता न करता नुसता स्वतचा खिसा भरावयाचा हे काही कामाचे नाही.गावात चांगल्या कामाला कोणी आडवा येत असेल तिथे त्याला तुडवून गाव कसा प्रगतीपथावर घेऊन जाता येईल याची काळजी घेणारा सरपंच हवा .नसता मी गावचा सरपंच म्हणून गाडीवर नुसते नाव टाकून फिरणारा लपुट काहीही कामाचा नाही.जनुपयोगी सरपंच असला पाहिजे. काही लोकांनी आत्ता नवीन पायंडा पडलाय आपल्याला विरोध करणाऱ्याला कोणत्या ना कोणत्या भांडणात गुंतवून आपापसात भांडणे लावून मजा बघणारा बघ्या नसला पाहिजे .गावात शांतता राहावी,दोन चार गट तट न राहता झाल गेलं विसरून नव्या जोमाने सर्वसमावेशक काम करणारा सरपंच असला पाहिजे.पण हल्ली मिटवण्या ऐवजी वाढवणारे 'तेलघाले' पुढारी जास्त झाले आहेत त्यामुळे गाव सूतात चालत नाही .सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो हे त्यांच्या कानात दोन ठोके देऊन सांगितलं पाहिजे की काय ?असा विचार मनात येतो .काहीना तर आवर्जून सांगावस वाटत की तू फक्त दोन चार टकुच्याचा सरपंच नाहीस बाबा, तू गावचा सरपंच झालास आता तुझ्यात सर्वांप्रती ' समभाव' हीच म्याचुरीटीची भावना असली पाहिजे.गरिबाला साथ देऊन सत्यवादी भूमिका मांडून गाव हाकला पाहिजे. तर असो हा प्रासंगिक लेखाने आपल्यात प्रकाश पडला असेल तर आपापल्या गावात विकास करुन परिवर्तन करावे भ्रष्टाचार मुक्त गाव करून देशासाठी योगदान द्यावे हीच नम्र विनंती.......
*प्रासंगिक लेखन - सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर संपर्क ९९२२५४१०३०*
stay connected