मा. आ. भीमराव धोंडे, पांडुरंग जाधव, प्राचार्य डॉ. विधाते यांच्या हस्ते पदवीप्रदान समारंभ संपन्न

 मा. आ. भीमराव धोंडे, पांडुरंग जाधव, प्राचार्य डॉ.  विधाते यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभ संपन्न 





कडा ( वार्ताहर):- शिक्षणाबरोबर समाजसेवा करण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा येथे केले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीदान समारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून माजी आमदार भीमराव धोंडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग जाधव हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर  विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ हरिदास विधाते, उपप्राचार्य डॉ बापु खैरे, उपप्राचार्य डॉ भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ संभु वाघुले, प्रा डॉ बाळासाहेब धोंडे, प्रा डॉ महेमुद पटेल, प्रा डॉ दत्तात्रय बोडखे, प्रा डॉ गुलाबराव मंडलीक ,प्रा डॉ पंडीत औटे, प्रा डॉ गोपीनाथ बोडखे व इतरांची उपस्थिती होती.

      प्रारंभी बाबाजींच्या पुतळ्याची पुजा करुन अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.

   पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, 2024 पासून  नवीन शैक्षणिक धोरण अमंलात येणार आहे नवीन धोरणानुसार टेक्निकल शिक्षणाची मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. आजच्या काळात संगणकाला खूप महत्त्व आहे प्रत्येकाने संगणकाचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष देऊन उच्च पदावर कार्यरत व्हावे.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी सांगितले की, नविन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. आगामी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करावा लागेल. विद्यार्थी जीवनात शिक्षण घेऊन यश संपादन करण्यासाठी कष्ट करावे लागतील.

माजी आमदार भीमराव धोंडे, पांडुरंग जाधव, प्राचार्य डॉ हरिदास विधाते यांच्या हस्ते बी. ए., बी. एस्सी. , बी. काॅम., एम. ए., एम, काॅम., एम एस्सी च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  

     पांडुरंग जाधव गुरुजी यांनी सांगितले की, माणसाच्या आयुष्यात शिक्षण महत्त्वाचे आहे. अगोदर स्वतः सुधारले पाहिजे मग इतरांना मार्गदर्शन करावे. शिक्षणाने मोठा अधिकार प्राप्त होतो. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. शिक्षण असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. समाजकारण, राजकारण करताना शुद्ध मनाने करावे. सुत्रसंचलन प्रा डॉ शैलजा कुचेकर यांनी केले. कार्यक्रमास पदवीधर विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. प्रा डॉ महेमुद पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.