*आष्टी येथे कवी हरिष हातवटेचे अध्यक्षतेखाली बाल कुमार कवी संममेलन संपन्न*
************************
************************
आष्टी (प्रतिनिधी) आष्टीचे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनानिमित्त
बुधवार दि.१५ मार्च रोजी आष्टी येथील पंडीत नेहरु विद्यालय आणि गंगुबाई धोंडे विद्यालयाचे सभागृहात कवी हरीश हातवटे यांच्या अध्यक्षतेखाली बाल कुमार कवी संमेलन संपन्न झाले.
यावेळी प्राचार्य सुरेश बोडखे, पुर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत,ह.भ.प.अशोक डोके सर,आकाश डोंगरे,विष्णु धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.प्रारंभी पत्रकार उत्तम बोडखे यांचा वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला.या कवीसंमेलनात प्रसिद्ध कवी, आल्लाउद्दीन,कवी संतोष दाणी,कवी राजेंद्र लाड, नवोदित कवी अक्षय घायाळ, कवी राजेंद्र बोडखे या कवींनी सहभाग घेऊन बालकुमार कवी संमेलनात आपल्या कविता सादर केल्या. या बालकुमार कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत यांनी केले.यावेळी प्राचार्य सुरेश बोडखे,विक्रम पोकळे,उत्तम बोडखे,कवी हरिष हातवटे,
संतोष दाणी यांंनी आपले मनोगत व्यक्त केले.दि.१० मार्च हा उत्तम बोडखे यांचा वाढदिवस झाला.मराठी भाषेच्या पहिल्या स्त्री लेखिका,
कवयित्री सावित्रीबाई फुले आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांंचा स्मृतिदिन याच दिवशी येतो हे दिन विशेष.या बालकुमार कवी संमेलनास
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत, वंदना बोडखे,सारिका गव्हाणे, विनोद विधाते,शारदा धोंडे, हनुमंत साळवे,श्रीकांत जंजिरे, दिलीप गायकवाड,विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
.
stay connected