इंजिनिअरींग कॉलेजमध्ये आनंदमहोस्तव उत्साहात साजरा
आष्टी दि. १५ (बातमीदार):
आष्टी येथील डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी इंजिनिअरींग कॉलेज व नर्सिंग कॉलेज च्या वतीने आनंदमहोस्तवाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदमहोस्तवात आठ दिवस क्रिकेट, खो-खो, कब्बडी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, चेस, बॅडमिंटन, मेहंदी, रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व चॉकलेट डे, ट्रेडिशनल डे, ब्लक अॅण्ड व्हाईट डे, ग्रुप डे, मिस मॅच डे, फन फियर डे या डे चे हि आयोजन करण्यात आले होते. या महोस्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. बी. राऊत हे होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य संजय बोडखे, प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांची होती कार्यक्रमात ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना या मान्यवरांच्या हस्ते कॉलेज ची ट्रॉफि देऊन सन्मानित करण्यात आले.नंतर विद्यार्थी व विध्यार्थिनीनी पूर्ण दिवसभर ड्रमा, लोकगीते, हिंदी गीते, मराठी गीते, लावण्या, सादरीकरण केले, . यावेळी फिश पॉईंट, मिझीकलफिश पॉईंट हि घेण्यात आले. लोकगीते, हिंदी गीते, मराठी गीते, लावण्या, सादरीकरण यांनी उपस्थित प्रेशकांचे मने जिंकली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्वेता बोडखे, जिनत शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन डोने सर यांनी मानले.
stay connected