आष्टी पोलीसांची बनावट दुध भेसळ करणाऱ्या विरुध्द कारवाई
राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष सतीष शिंदे वर गुन्हा दाखल
दिनांक 15.03.2023 रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे आष्टी हददीतील संभाजी नगर येथील पिठाची गिरणीच्या बाजुला एका खोली मध्ये बनावट दुध तयार करण्यासाठी लागणारे पावडर , रसायण हे साहित्य खाली करीत आहेत. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरुन लागलीच अन्न व औषध प्रशासन विभाग बीड यांना संपर्क करुन बोलावुन घेतले असता श्री. सय्यद इम्रान हाश्मी ,सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीड , मुख्तार शेख ,नमुना सहाय्यक हे आले सदर ठिकाणी मिळुन आलेल्या पावडरच्या 132 पांढऱ्या व खाकी रंगाच्या गोण्या व पत्राचे 220 डब्बे पैकी अन्न व औषध प्रशासन विभागचे अधीकारी यांनी आवश्यक नमुने विश्लेषन तपासणी करीता राखुन ठेवले असुन अन्न व प्रशासन विभाग सहाय्यक आयुक्त , श्री सय्यद इम्रान हाश्मी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदर कारवाई मध्ये बनावट दुध तयार करण्याचे साहीत्य व त्यासाठी वापरत असलेले पिकअप व इंडीका असा एकुण 891375/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर ठिकाणी मिळुन आलेला इसम नामे नंदु भागवत मेमाणे व ज्या ठिकाणी बनावट दुध तयार केले जाते त्या जगदंबा मिल्क ऍ़ण्ड मिल्क प्रॉडकटस चे मालक सतीश नागनाथ शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल असुन इसम नामे नंदु मेमाणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री .नंदकुमार ठाकुर , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर , मा.उपविभागीय पोलीस अधीकारी श्री.अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक श्री.हेमंत कदम , सपोनि श्री.विजय देशमुख, पोउपनि श्री.प्रमोद काळे, पोउपनि श्री नामदेव धनवडे , पोह श्री दत्तात्रय टकले, महीला पोलीस हवालदार स्वाती मुंडे , पोलीस अंमलदार श्री प्रविण क्षीरसागर , अमोल ढवळे, बब्रुवान वाणी, भरत गुजर , शिवप्रकाश तवले, आकाश आडागळे, सचिन पवळ , रियाज पठाण , सचिन कोळेकर , जिजा आरेकर , मर्जीना शेख व होमगार्ड पथकातील जवान व श्री .सय्यद इम्रान हाश्मी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग बीड , व श्री . शेख मुख्तार , नमुना सहाय्यक बीड यांनी केली.
stay connected