कारखेल बु येथे शौचास गेलेल्या तरुणांनावर प्राणघातक वाघाचा हल्ला. .. धामणगाव सह परिसरातील नागरिकामद्ये भीतीचे वातावरण ..

 कारखेल बु येथे शौचास गेलेल्या तरुणांनावर  प्राणघातक वाघाचा हल्ला. ..
धामणगाव सह परिसरातील नागरिकामद्ये भीतीचे वातावरण ...






धामणगाव दादा पवळ -:


 आष्टी तालुक्यातील धामणगाव जवळील कारखेल बु येतील वस्तीवरील शौचास गेलेल्या तरुणावर वाघाचा हल्ला, धामणगाव परिसरातील घटना

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू


 शौचास गेलेल्या रामा गायकवाड या तरुणावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला धामणगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना आज शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील कारखेल बु येथे घडली आहे.

रामा गायकवाड (३०) रा.कारखेल  बुद्रुक असे जखमी तरुणाचे नाव आहे.




प्राप्त माहितीनुसार संजय राठोड व डॉ अकिल सय्यद यांच्या माहितीनुसार  आज पहाटे ४ वाजताच्या दरम्यान रामा गायकवाड शौचास जाण्यासाठी शेतात गेला. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने रामाच्या मानेवर व डोक्यावर. पाठीवर गळ्यावर पंज्याने वार केले त्यात तो गंभीर झाला. वाघाने हल्ला करताच रामाने आरडा ओरड केला. त्यामुळे परिसरातील लोक धावून आले. लोकांना पाहून वाघाने तिथून धूम ठोकली. घटनास्थळी राम  गंभीर रित्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ धामणगाव येथील डॉ अकिल सय्यद यांच्या हॉस्पिटल मद्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.