*कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने भरणार उमेदवारी अर्ज...चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज*
*चंद्रकांत पाटील यांचे नाना पटोलेंना आवाहन, चिंचवड मतदारसंघातील बिनविरोध म्हणून घोषित करून दाखवा....*
*आमचं काम हीच वस्थुस्थिती आहे आणि ती जनतेसमोर आहे - चंद्रकांत पाटील*
पुणे , ०६ जानेवारी : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे . भाजपकडून दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसाब पेठ मधून हेमंत रासणे यांना संधी देण्यात आली आहे. आज हेमंत रासने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहळ , जगदीश मुळीक आणि इतर कार्यकर्त्यांसह पुण्यनगरीचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचंही दर्शन घेऊन, मनोभावे पूजा केली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवड मध्ये एक न्याय आणि कसबा पेठमध्ये वेगळा न्याय अशी चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. त्यातच ब्राम्हण समाजावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. आमचं काम हीच वस्थुस्थिती आहे आणि ती जनतेसमोर आहे. समज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे शब्द आहेत. वस्तुस्थिती निर्माण करायला काम लागत. आमचं ग्राउंड वर काम आहे आणि ब्राम्हण समाजाला याची जाणीव आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, हि निवडणूक बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोले असं म्हणतात कि जागा टिळकांच्या घरात दिली असती तर आम्ही विचार केला असता. माझं नाना पटोलेंना आवाहन आहे कि, आम्ही चिंचवड मतदारसंघात तर जगताप यांच्या घरातील सदस्य दिला आहे त्यामुळे तेथे बिनविरोध घोषित करून दाखवा. आम्ही गाफील नाही. आम्ही निवणुकीची तयारी सुरु केली आहे. नाना पाटोले यांनी इतर पक्षांशी बोलून सांगावे कि टिळकांच्या घरातील सदस्य दिल्यावर आम्ही निवडणूक बिनविरोध करू मग आम्ही निर्णय घेऊ.
stay connected