शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी - मुख्यमंत्र्यांकडे देविदास गुंड यांनी केली मागणी
आष्टी ( प्रतिनिधी ) - सन. 2022 -2023 मध्ये अतीवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसान भरपाई मिळावी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते देविदास गुंड रा . वाघळूज यांनी मुख्यमंत्री यांना आपले सरकार वर निवेदन केले आहे
या विषयी माहिती अशी की सन 2022-2023 मध्ये शेतकऱ्यांचे अतीवृष्टी व सततच्या पावसामुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले. परंतु मा. तहशीलदार आष्टी याच्याकडे वेळोवेळी चौकशी केली मात्र अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही हे उत्तर मिळाले. राज्य सरकारने या प्रकरणी आपल्या स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा व शेतकऱ्यांची झालेली नुसकान भरपाई देऊन सहकार्य करावे. मदत भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे . या संदर्भात दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचे देविदास गुंड यांनी सांगीतले .
stay connected