*आष्टी येथे माता रमाई आंबेडकर जयंती संपन्न..!*

 *आष्टी येथे माता रमाई आंबेडकर जयंती संपन्न..!* 

-------------------------------------




 संदिप जाधव/आष्टी

आष्टी येथे माता रमाई जयंती आष्टी येथील सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने माता रमाई जयंती उत्साहात संपन्न झाली.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचा आज जन्मदिवस त्या निमित्ताने आष्टी येथील बुद्धविहार प्रारंगणात जयंती साजरी करण्यात आली.

माता रमाईने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी शेणाच्या गवऱ्या थापुन बाबासाहेब शिक्षणासाठी पैसे पाठवत असत.रमाईच्या महान त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर घडले कारण माता रमाई जरी आडाणी होत्या.परंतु त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडु दिले नाही.

प्रत्येक महापुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे सुद्धा माता रमाईचाच हात आहे अशा महान त्यागमुर्ति माता रमाईस जयंतीनिमित्त समस्त भिमसैनिकांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.. यावेळी 

वामन बापू निकाळजे, महालिंग दादा निकाळजे, अशोक अंकल, धनू सर निकाळजे, दिपक दादा निकाळजे,कुणाल निकाळजे, ज्ञानदेव काळे,  दिलीप निकाळजे, रंगनाथ धोंडे (मा. न.अध्यक्ष), नगरसेवक सुरेश वरांगुळे, मिलिंद निकाळजे (सेवानिवृत्त API), अशोक अण्णा निकाळजे,रमेश पवळे, जालिंदर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, प्रविण गायकवाड, संजय निकाळजे

कुसुम काकू निकाळजे, गवळण बाई शिरसाठ , 

नगरसेविका वैशाली दिपक निकाळजे, पुष्पा काकू निकाळजे, दिपाली सदाफुले, पौर्णिमा निकाळजे,कल्पना निकाळजे ,मंदा साळवे छाया निकाळजे, निकाळजे, छाया शिंदे, रेखा निकाळजे, सरपंच वंदना गायकवाड, प्रज्ञा ताई निकाळजे, माया निकाळजे, पिंकी ताई गायकवाड, सुमन निकाळजे, सुनीता काळपुंड, शोभा जालिंदर गायकवाड, सुजाता निकाळजे, स्वाती निकाळजे, स्मिता निकाळजे , संजना निकाळजे, उषा निकाळजे. आदी सर्व उपासक उपासिका उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.