शिक्षकांवर दोषारोपण करु नये
समस्या ......सा-यांनाच येत असतात समस्या. मग गरीब असो की श्रीमंत. ते विद्यार्थी असो की शिक्षक. माणूस असो की स्री. प्राणी असो की वनस्पती.
प्राण्यांचा समस्येच्या बाबतीत विचार केल्यास त्यांनाही समस्या असतातच. कारण कोणताही प्राणी केव्हा त्यांना मारुन खाईल याची काही शाश्वती नसते. तसेच मानव प्राणीही केव्हा त्यांना जायबंदी करेल हेही सांगता येत नाही. आज कोंबड्या, ती बक-यांचा आपण घेत असलेले बळी पाहता आपल्याला सारासर दिसून येईल की प्राण्यांनाही समस्या येतातच. आता राहिल्या वनस्पतीय समस्या. वनस्पतींना समस्या येतात असं म्हणणं हास्यास्पद होईल. परंतू वनस्पतींनाही समस्या येतातच. त्यांना समस्या येतात, जेव्हा त्यांना कीड लागते. तसेच त्यांना समस्या येतात, जेव्हा हा मानव प्राणी त्यांची हत्या करतो. हत्या...... होय हत्या. जेव्हा आपण त्यांना कापतो, ती त्यांची हत्याच. मग हीच समस्या असते त्यांची. या अनुषंगानं मानव प्राण्यातही समस्या निर्माण होत असतात. त्यांच्या समस्या त्यांना मरेपर्यंत संपत नसतात. काही समस्या तर माणूस मेल्यानंतरही संपत नाहीत. याच प्रकारात येतात शिक्षकांच्या समस्या. त्यांची सर्वात मोठी समस्या असते ती वेदनाची. कितीही वेतन मिळालं तरी ते वेतन आजच्या महागाईच्या काळात पुरत नाही. म्हणून डी ए, एच आर ए वाढवावं लागतं. वरीष्ठ श्रेण्या व वार्षीक वेतनवाढ लावावी लागते.
कोणी म्हणतात की शिक्षक करतोच काय, त्याला कोणत्या समस्या. मस्त उन्हाळभर सुटी असते. दिवाळीतही सुट्ट्या असतात. आता नाताळच्याही सुट्ट्या मिळायला लागल्या. वेतनही भरपूर असतं. मग त्या शिक्षकांना समस्या म्हणणं म्हणजे आतिशयोक्ती आहे. खरं आहे हे म्हणणं. परंतू जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे. मासोळी पाण्यात राहाते. आपल्याला वाटतं की तिचं जीवन सुंदर आहे. परंतू तिचं जीवन तिलाच माहीत. ती ती कशी जगते. ती कशी मोठी होते हे तिलाच कळतं. लहानपणापासूनच तिच्या जीवाला धोके निर्माण होत असतात. अगदी लहान असतांना तिला मोठे प्राणी खावून टाकतात. थोडी मोठी झाली की माणसाची शिकार व्हावं लागतं. त्यातच कधीकधी वातावरणातील बदलही त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असतो. कधी एकदम कडाक्याची थंडी पडते. तेव्हाही मासोळ्या मरण पावतात. कधी पूर येतो. त्यावेळी मासोळ्या काठावर फेकल्या जातात. परंतूू जेव्हा पूर ओसरतो, ती तेव्हा त्या मासोळ्या पुराच्या पाणी ओसरताच त्या मुळ पाण्यात जात नाहीत. मग बाहेरचं पाणी आटतं, त्यावेळी काही मासोळ्या बगळ्यासारख्या प्राण्यांचे भक्ष ठरतात. काही मरतात. तोच धोका होतो त्सुनामीच्याही काळात. ही समस्याच झाली की नाही मासोळ्यांची. जीवनात असे कोणीही व्यक्ती समस्येपासून सुटलेले नाहीत. आज असे बरेच व्यक्ती आहेत की ज्यांना समस्या सतावते. शिक्षकांच्या बाबतीतही तसंच आहे. आपल्याला वाटते की शिक्षकांना सुट्ट्या असतात. परंतू त्या काळातही ते घरी बसून शाळेतील कामं करीत असतात. अशी कामे करावी लागतात की ज्या कामासाठी शांत डोकं लागतं. जसे विद्यार्थ्यांना वर्षभर काय शिकवायचे? याचं नियोजन उन्हाळ्यात तयार करावं लागतं. त्यातच तासीका विभागणी करणं हे जिकीरीचं काम असतं. ती ते काम शाळा सुरु ठेवून वा शाळेत जावून करता येणं शक्य नसतं. त्याला निवांत वेळ हवा असतो. तो वेळ शाळेतील कल्लोळात मिळत नाही.
अभ्यासक्रम तयार करणे. आराखडा बनवणे.वार्षीक नियोजन, मासीक नियोजन, पाठनियोजन लिहिणे. ही प्रक्रिया एकाच दिवशी संपणारी नसते. त्यांना महिना दोन महिने लागतातच. ते काम उन्हाळ्यात चालते. त्यातच वर्षभरात शिकवून जो काही मानसीक ताण त्यांच्यावर येतो. तो घालविण्यासाठी त्यांना उन्हाळभर सुट्टीच हवी असते. त्याशिवाय तो ताण घालवता येत नाही. जर त्यांना ही उन्हाळ्याची सुटी दिली गेली नसती तर बरेच शिक्षक वेडे झाले असते हे सांगायला नको. आता दिवाळीच्या सुट्ट्या सांगतो. या सुट्ट्यात पेपर तपासणे. त्याचे गुणदान लिहिणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. या गोष्टींना आठ पंधरा दिवस नक्कीच लागतात. त्यामुळं या सुट्ट्या. परंतू याच सुट्ट्या सर्वांना खलतात. कारण ते काही त्याच्या वंशात नसतात. तसंच दूरुनच डोंगर चांगलं दिसतं. जवळून खाचखळगेच. तसंच मंदीराच्या गाभा-यात गेल्याशिवाय देव त्या मंदीरात कोणता आहे ते कळत नाही. तीच स्थिती शिक्षकांच्या बाबतीत आहे. लोकांची म्हणूनच त्यांच्यावर दोषारोपण न केलेलं बरं.
तो दुःखी असतो. त्यातच अशा दुःखी कष्टी शिक्षकांना संस्थाचालक, ती पालक, विद्यार्थी, अधिकारी, आजचे नेते इत्यादी घटक अलीकडे त्रास द्यायला लागले आहेत. कोणी वेतनाच्या माध्यमातून तर कोणी इतर बाकी सर्व माध्यमातून. संस्थाचालक देण म्हणून त्याच्या वेतनातील पैसा उकळतो. अधिकारी त्याला पदभार लावत नसून त्यांच्यावर एकतर्फी अन्यायच करतो. विद्यार्थी त्यानं मारु नये वा किरकोळ शिक्षा करु नये म्हणून त्यांनाच पालकांना तक्रार करण्याच्या धमक्या देतो व काही काही निर्बुद्ध पालकही आपल्या मुलांच्या ज्ञानाचा विकास करीत असतांना अशा शिक्षकांना समजून न घेता त्यांच्या तक्रारी पोलिसांना करण्याच्या धमक्या देतात. नेतेही त्यांना देण द्यावी म्हणून सतत शिक्षकांना धमक्या देत असतात. अशा भयावह वातावरणात राहावं लागतं शिक्षकांना. तरीही तो कुणाची तक्रार करीत नाही. फक्त आपलं कर्तव्य बजावत असतो. ह्या शिक्षकांच्या समस्या झाल्या. विद्यार्थ्यांच्याही समस्या असतात.
विद्यार्थी वर्गालाही असतात समस्या. असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. विद्यार्थ्यांच्या किरकोळ गोष्टीला प्राधान्य देऊन विचार केला तर आपल्यापुढे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या समस्या येत असतात. परंतू विद्यार्थ्यांच्या समस्या कोणत्या असतील असा आपल्याला विचार येतो. कारण ख-या समस्या येतात शिक्षकांना. ते दाखवतातही. त्यांची खरी समस्या असते वेतनाची. परंतू विद्यार्थ्यांच्या समस्या दिसत नाहीत. असे म्हणून आपल्याला तसा विचार येणं साहजीकच आहे. त्याही समस्या शिक्षकांच्याही होतात. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांनाही समस्या असतात. त्या त्या शिक्षकांच्या कशा होतात. त्या समस्या थोडक्यात मांडतो.
१} पहिली समस्या म्हणजे अलीकडच्या काळात विद्यार्थी ज्यावेळी शाळेतील दरवाजात प्रवेश करतात. तेव्हा शाळा त्यांच्यासाठी नवीन असते. तिथं त्याला नवीन मित्र दिसतात. मायबाप दिसत नाही. ती मायबापाची अपूर्णता शिक्षकाला पुरी करावी लागते. अशावेळी ती विद्यार्थ्यांची समस्या शिक्षकांची होवून जाते.
२} दुसरी समस्या म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टींची सवय नसते. जसे. शौचाला जाणे. त्या शौचाला जाण्याची सवय शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना लावायची असते. अशी सवय लावत असतांना कधीकधी शिक्षक विद्यार्थांना शौचाची सुट्टीच देत नाहीत. त्यामुळं ते विद्यार्थी शाळेतच शौच करतात. त्यात अगदी मोठमोठ्या मुलांचाही समावेश होतो. त्याही समस्या ह्या विद्यार्थ्यांच्या होवून जातात. एक प्रसंग सांगतो, सहाव्या वर्गाचा एक प्रसंग. शाळेत मुलांना लघवीच्या दोन सुट्ट्या होत असतात. तरीही एका शाळेत सहावीच्या एका मुलीला लघवीची सुट्टी दिली नाही. त्यामुळे त्या मुलीनं कपड्यातच लघवी केली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला होता.
शिक्षक विद्यार्थांचे शत्रू नसतात. परंतू त्यांना विद्यार्थ्यांना सवय लावावी लागते. खास करुन मुलींना. मुलांचं ठीक आहे. ते कुठेही लघवी करायला बसू शकतात. परंतू मुली? मुली कुठेही बसू शकत नाही. त्यामुळे शौचाला जाण्याची सवय शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना लावावीच लागते व तिही बाब शिक्षकांसाठी एक समस्याच ठरते.
३} तिसरी समस्या म्हणजे विद्यार्थ्यांचे तरुण होणे. खास करुन विद्यार्थीनीचे. विद्यार्थ्यीनी जेव्हा तरुण होतात, तेव्हा बाहेरचे मुलं त्या विद्यार्थ्यीनीवर लक्ष ठेवून असतात. अशावेळी जर शाळेतील मुली समंजस असल्या की शिक्षकांना काळजी करण्याची गरज नसते. परंतू जर मुली समंजस नसतील तर मात्र शिक्षकांपुढे समस्या तयार होते. त्यामुळे त्यांचं निराकरण करणं अवघड जातं. अशावेळी जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले तर मोठा अनर्थ होतो. याबाबतीतही एक प्रकरण सांगतो. एका शाळेतील एक मुलगी शाळेतून एका बाहेरच्या मुलाला हात हालवून इशारे करीत होती. अशावेळी तिच्यावर एका शिक्षकाची नजर पडली. तेव्हा शिक्षकानं तिला त्याबद्दल विचारलं,
"कोण आहे?"
"कोणी नाही."
"ओळखीचा आहे का?"
"नाही."
"मग कशाला हात हालवत होती?" ते शिक्षकाचं बोलणं. मुलगी गप्प होती.
अशा समस्या............अशा प्रकारच्या भयावह समस्या शिक्षकांपुढे येत असतात. काही समस्येत विद्यार्थ्यांना जेव्हा सुुट्ट्या होतात. त्या सुटीनंतर अशी बाहेेरची मुलं मुलींना थांंबवत असतात व छेेड काढत असतात.
काही समस्या ह्या शिकण्याच्याही असतात. शिक्षकाने कितीही चांगले शिकवले तरी ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहात नाही. तिही एक समस्याच असते शिक्षकांची. कारण कितीही चांगलं शिकवलं तरी विद्यार्थी उत्तरात मागे पडल्याने शिक्षकांवर ताशेरे ओढले जातात. त्यात शिक्षकांना दोषी धरलंं जातंं.
महत्वाचं म्हणजे सा-याच समस्या. मग त्या विद्यार्थ्यांच्या असो की निसर्गशक्तीच्या. दोष प्रत्येकातच असतात. परंतू आपण त्याचा बाऊ करतो व दोष देत राहातो. असा दोष शिक्षकांनाच देत असतो. परंतू असं कोणावर दोषारोपण करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे पाहावं. आत्मपरीक्षण करावं. कारण जेव्हा आपण एक बोट दुस-याकडे दाखवतो ना. तेव्हा आपलेच चार बोटं आपल्याकडे असतात. ही वास्तविकता आहे. मानावं की काही काही शिक्षकही दोषी असतात. ते शिकवीत नाहीत. कुठंतरी नात्यातील माणसं असल्यानं व नातेसंबंध जोपासावे लागत असल्यानं व शिक्षकांना बोलता येत नसल्यानं मुुख्याध्यापक बोलत नाही वा बोलू शकत नाही. त्याचाच फायदा शिक्षक घेतो. परंतू असे शिक्षक जास्त नसतात. तेे शिक्षक तांदळात खडे असल्यासारखेच असतात. ज्यांच्यामुळं संपुर्ण शिक्षकपेशा बदनाम होत असतो.
अशा शिक्षकांना सोडले तर संपुर्ण शिक्षक चांंगले असतात दुधासारखे. ते आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. विनाकपटाने शिकवीत असतात. ते वर्षभरच विद्यार्थ्यांसाठी राबत असतात. मग उन्हाळी, दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्या का असेना, ते त्यासाठी सुट्ट्यांंचाही लाभ घेत नाही. ते काम करीत असतात सतत. कोणी आदर्श म्हणावेे म्हणून नाही. कधी कोणी त्यांना आदर्श म्हणावे अशी त्यांची अपेेक्षा नसते. तसंंच तेे कोणी वाईट म्हटलं तर त्याकडेही तेे ढुुंकून पाहात नसतात. तेच ख-या अर्थानं हाडाचे शिक्षक असतात यात दुमत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

.jpeg)
stay connected