सपोनि शंकर वाघमोडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानीत
----------------------------------------
केज प्रतिनिधी :- पोलीस सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करूण सामाजीक पटलावर आपली वेगळी छबी उमटविणारे केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी प्रमुखांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.
सविस्तर वृत्त असा की भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केजच्या वतीने प्रशासकीय, सामाजीक,पत्रकारीता,शैक्षणिक, वैद्यकीय,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन फेब्रुवारी महिन्यात सन्मानीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या पुरस्कारतील शासकीय पुरस्कारासाठी केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांची निवड केली आहे.बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व प्रभारी निरीक्षक यांच्या नेमणूका इतर ठीकाणी केल्याने त्यामध्ये केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची गेवराई तालुक्यात बदली झालेमुळे ते फेब्रुवारीत या पुरस्कार सोहळ्यासाठी शासकीय कामामुळे येतील की नाही याची शंका राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अजय भांगे यांच्या मनात आल्याने त्यांनी दि ०७ फेब्रुवारी मंगळवार रोजी केज पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या निरोप समारंभ प्रसंगी केज पोलिस ठाण्यामध्ये जाऊन उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्काराने
शंकर वाघमोडे यांना सन्मानीत केले प्रसंगी या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार अजय भांगे, उपाध्यक्ष पत्रकार साजेद इनामदार, तालुका सरचिटणीस मुबशीर खतीब, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे,सचिव गौतम बचुटे,पत्रकार धनजंय कुलकर्णी ,डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास तपसे झुंझार पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय हाडिबाग, सचिव पत्रकार दशरथ चवरे,सक्रिय पत्रकार संघाचे सदस्य महादेव गायकवाड,पत्रकार दिनकर राऊत,पत्रकार सयबाज,भाजपाचे जेष्ठ नेते दत्तात्रय धस पत्रकार गुळभिले,पत्रकार महादेव दळवी , पत्रकार विजय आरकडे,रिपाइंचे केज शहराध्यक्ष भास्कर मस्के सह विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected